भय इथले संपत नाही...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:09 IST2021-04-20T04:09:05+5:302021-04-20T04:09:05+5:30
सावनेर/नरखेड/काटोल/ कळमेश्वर/ कुही/रामटेक/हिंगणा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे संकट कायम आहे. सोमवारी तेरा तालुक्यात १७८० रुग्णांची भर पडली ...

भय इथले संपत नाही...
सावनेर/नरखेड/काटोल/ कळमेश्वर/ कुही/रामटेक/हिंगणा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे संकट कायम आहे. सोमवारी तेरा तालुक्यात १७८० रुग्णांची भर पडली तर ३२ रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णाला उपचार मिळावेत यासाठी ग्रामीण भागात नातेवाईकांची दिवसभर धावपळ दिसून आली.
कोरोनाच्या विळख्यात असलेल्या सावनेर तालुक्यात २३९ रुग्णांची नोंद झाली तर ८ जणांचा मृत्यू झाला. शहरात ७१ नागरिक बाधित झाले तर ग्रामीण भागात ही संख्या १६३ वर पोहोचली.
नरखेड तालुक्यात १२१ रुग्णांची भर पडली. यात शहरातील २३ तर ग्रामीण भागातील ९८ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १५७१ तर शहरात २६७ इतकी झाली आहे. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव अंतर्गत येणाऱ्या गावात (३१), जलालखेडा (३१), मेंढला (१२) तर मोवाड प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या गावात २४ रुग्णांची नोंद झाली.
काटोल तालुक्यात ८५४ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत १८४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात शहरातील ६१ तर ग्रामीण भागातील १२३ रुग्णांचा समावेश आहे.
रामटेक तालुक्यात १६० रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील ४५ व ग्रामीण भागातील ११५ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४४०७ झाली आहे. यातील २२३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २१७५ इतकी आहे.
कळमेश्वर तालुक्यात १४२ रुग्णांची नोंद झाली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी न.प.क्षेत्रातील २४ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात धापेवाडा येथे सर्वाधिक १८ रुग्णांची नोंद झाली.
कुही तालुक्यात ८१८ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ९१ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तालुक्यात एकूण बाधितांची संख्या २८३३ इतकी झाली आहे. सोमवारी कुही शहर आणि परिसरात २३, मांढळ (११), वेलतूर (३५), साळवा (४) तर तितूर येथे ११ रुग्णांची नोंद झाली.
हिंगणा तालुक्यात २३९ रुग्ण
हिंगणा तालुक्यात सोमवारी १५४९ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत २३९ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तालुक्यात सर्वाधिक ७० रुग्णांची नोंद वानाडोंगरी येथे झाली. सध्या तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ९१४९ झाली आहे. यातील ५७६४ रुग्ण बरे झाले आहेत तर १७८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.