भय इथले संपत नाही...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:08 IST2021-04-18T04:08:07+5:302021-04-18T04:08:07+5:30
रामटेक/ सावनेर/काटोल/ कळमेश्वर/ मौदा/ नरखेड /कुही/ हिंगणा/ उमरेड : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाने थैमान घातले आहे. शनिवारी आणखी ...

भय इथले संपत नाही...
रामटेक/ सावनेर/काटोल/ कळमेश्वर/ मौदा/ नरखेड /कुही/ हिंगणा/ उमरेड : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाने थैमान घातले आहे. शनिवारी आणखी ३३ रुग्णांचा जीव गेला तर २४४७ रुग्णांची भर पडली. ग्रामीण भागात आतापर्यंत मृतांची संख्या १४१२ इतकी झाली आहे. जिल्ह्यातील तेरा तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या ७९,२१३ वर पोहोचली आहे. शनिवारी ११२४ रुग्ण बरे झाले. सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २६,१०८ इतकी आहे. कोरोनाबाधितांना योग्य उपचार मिळत नसल्याने ग्रामस्थात आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सावनेर तालुक्यात ३४२ रुग्णांची भर पडली तर ५ जणांचा मृत्यू झाला. शनिवारी सावनेर शहरात ८८ तर ग्रामीण भागात २५४ रुग्णांची नोंद झाली.
नरखेड तालुक्यात १८२ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील १४ तर ग्रामीण भागातील १६८ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १५६८ तर शहरात २४१ इतकी झाली आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव अंतर्गत ६४, जलालखेडा (३५), मेंढला (२३) तर मोवाड येथे ४६ रुग्णांची नोंद झाली.
काटोल तालुक्यात शनिवारी १३५१ नागरिकांची चाचणी करण्यात आली. तीत १४७ नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. काटोल शहरात ७२ तर ग्रामीण भागात ७५ रुग्णांची नोंद झाली. कुही तालुक्यात ६२२ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात १०२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात कुही येथे १५, मांढळ (२२), वेलतुर (४१), साळवा(११) तर तितूर येथे १३ रुग्णांची नोंद झाली. सध्या तालुक्यातील बाधितांची संख्या २७४२ इतकी झाली आहे.
उमरेड तालुक्यात ९४ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील ६१ तर ग्रामीण भागातील ३३ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात आतापर्यंत ७१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कळमेश्वर तालुक्यात आणखी १८२ रुग्णांची भर पडली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी न.प. क्षेत्रातील २६ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात तेलकामठी येथे सर्वाधिक ३१ रुग्णांची नोंद झाली.
रामटेक तालुक्यात १९८ रुग्णांची नोंद झाली. यात रामटेक शहरातील २२ तर ग्रामीण भागातील १७६ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ४२२२ झाली आहे. यातील १८१९ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या अॅटिव्ह रुग्णांची संख्या २४०३ इतकी झाली आहे.
मौदा तालुक्यात ९५ रुग्णांची नोंद झाली. तालुक्यातील बाधितांची संख्या २४०९ इतकी झाली आहे. यातील ११५१ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १२१२ इतकी आहे.
हिंगणा तालुक्यात पुन्हा १७२ बाधित
हिंगणा तालुक्यात शनिवारी १७२ रुग्णांची भर पडली. यात सर्वाधिक ६५ रुग्णांची नोंद वानाडोंगरी येथे झाली. सध्या तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ८८६३ झाली आहे. यातील ५६७८ रुग्ण बरे झाले आहेत तर १६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.