शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

देशभरात १ लाखावर शाळा बंद होण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 21:49 IST

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० हे देशातील देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे नसून भारतीय संविधानाला अभिप्रेत असणाऱ्या मूल्यांशी विसंगत आहे. तसेच ते खासगीकरण, बाजारीकरणाला प्रोत्साहन देणारे आहे. त्यामुळे प्रस्तावित नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने देशाचे पंतप्रधान व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्दे नवीन शिक्षा धोरणाचा पुनर्विचार करण्याची शिक्षक संघटनांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० हे देशातील देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे नसून भारतीय संविधानाला अभिप्रेत असणाऱ्या मूल्यांशी विसंगत आहे. तसेच ते खासगीकरण, बाजारीकरणाला प्रोत्साहन देणारे आहे. त्यामुळे प्रस्तावित नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने देशाचे पंतप्रधान व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.नवीन शैक्षणिक धोरण हे सर्वसामान्य व गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर लोटणारे आहे. आजचे युग हे तंत्रज्ञानाचे असले तरी आजही देशात केवळ २० टक्के पालकच असे आहेत जे आपल्या पाल्यांना ऑनलाईन व डिजिटल शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देऊ शकतात. परंतु नव्या शैक्षणिक धोरणात डिजिटल शिक्षणाचा अनाकलनीय आग्रह धरण्यात आला आहे. पयार्याने बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकाराला फाटा देत बालकांच्या मोफत शिक्षणाची जबाबदारी शासन जाणीवपूर्वक नाकारत असून त्यामुळे गोरगरिबांची मुले दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. एकीकडे आत्मनिर्भर भारताची संकल्पना मांडली जात असताना शिक्षणासारख्या मूलभूत क्षेत्रात गुंतवणूक करण्याची विदेशी विद्यापीठांना खुली सूट देणे ही बाब दुर्दैवी आहे. केंद्र्र शासनाच्या या भूमिकेमुळेच कमी पटसंख्येच्या नावावर देशातील १ लाख १९ हजार शाळा बंद होणार आहेत. त्यामुळे देशातील शोषित, वंचित, शेतकरी-शेतमजूर, गोरगरीब यांच्या हिताचा सर्वंकष विचार करून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा पुनर्विचार करून त्यामध्ये सुधारणा करण्यात याव्यात अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे व सरचिटणीस अनिल नासरे यांच्या शिष्ट्यमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात केले.

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षण