शहरं
Join us  
Trending Stories
1
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
2
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
3
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
4
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
5
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
6
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
7
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
8
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
9
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
10
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
11
ठाण्यात एकाच घरात दोन पक्ष! मुलगा शिंदेसेनेतून, आई राष्ट्रवादी (शरद पवार) कडून आमने-सामने
12
Shrejal Guleria : अभिमानास्पद! वडील सैन्यात सुभेदार, लेक बनली फ्लाइंग ऑफिसर; तिसरी पिढी देशसेवेसाठी सज्ज
13
Video: आरारारा... खतरनाक! जेसन होल्डरने टाकला अजब-गजब चेंडू, क्रिकेटविश्वात रंगलीये चर्चा
14
सूडाची भावना! खांबाला बांधलं, केसाला धरुन फरफटत नेलं; लव्हमॅरेज केल्यावर जावयाला मारहाण
15
पनवेलमध्ये 'मविआ'ला उमेदवारांनीच दिला झटका! ७ जणांची माघार, भाजपाचे किती उमेदवार बिनविरोध विजयी?
16
राष्ट्रवादीचा 'मास्टरस्ट्रोक'! डॉक्टर, इंजिनिअर्ससह उत्तर भारतीयांना संधी, मलिक म्हणाले...
17
महापौरांसह सर्व समित्यांचे अध्यक्ष मराठीच हवेत! 'महानगरपालिकेसाठी मराठीनामा' कुणी केला जारी?
18
कधी काळी सचिन तेंडुलकरची झोप उडवणारा गोलंदाज; आज क्रूझ शिपवर गाणी गाऊन उदरनिर्वाह
19
कल्याण-डोंबिवलीत महायुतीने मतदानाआधीच अर्धी लढाई जिंकली, तब्बल १९ उमेदवार बिनविरोध
20
Jalgaon Municipal Election 2026: भाजपा-शिंदेसेनेचा विजयाचा 'षटकार'! युतीचे १२ उमेदवार बिनविरोध, वाचा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीच्या ५० टक्के जागा रिक्त राहण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 22:33 IST

शिक्षण संचालनालयातर्फे महापालिकेच्या हद्दीत अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. पण ही प्रक्रिया शहरातील ज्युनियर कॉलेजची डोकेदुखी वाढविणारी आहे. या प्रक्रियेमुळे शहरातील अनेक कॉलेजच्या जागा रिक्त राहत असल्याची ओरड होत आहे.

ठळक मुद्दे उपलब्ध जागेच्या तुलनेत नोंदणी कमी : गेल्यावर्षीही २१ हजारावर जागा होत्या रिक्त

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शिक्षण संचालनालयातर्फे महापालिकेच्या हद्दीत अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. पण ही प्रक्रिया शहरातील ज्युनियर कॉलेजची डोकेदुखी वाढविणारी आहे. या प्रक्रियेमुळे शहरातील अनेक कॉलेजच्या जागा रिक्त राहत असल्याची ओरड होत आहे. गेल्यावर्षी ५८ हजार जागांपैकी २१ हजार जागा रिक्त राहिल्या होत्या. यावर्षी ही संख्या ५० टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.शहरातील २१६ कॉलेजमध्ये यावर्षी अकरावीच्या ५९,०४० जागा आहेत. केंद्रीय प्रवेश समितीतर्फे राबविण्यात येत असलेल्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत ४०,२२९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी दहावीचा निकाल जास्त लागला आहे. शिवाय सीबीएसई बोर्डाचाही निकाल उत्तम आला आहे. त्यामुळे यंदा उपलब्ध जागेपेक्षा नोंदणी अधिक होईल, असा अंदाज होता. मात्र ४० हजारावर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यापैकी ३३,६९० विद्यार्थ्यांनी अर्जाचा पहिला भाग भरला. ३३,६३० विद्यार्थ्यांनी दुसरा भाग भरला. तर २९,१५७ विद्यार्थ्यांनी ऑप्शन भरले. ३० सप्टेंबरला समितीने प्रवेशाची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. पण नोंदणी अजूनही सुरूच आहे. परंतु आतापर्यंत झालेली नोंदणी लक्षात घेता रिक्त जागांच्या आकडेवारीत फार फरक पडणार नाही, असे भाकीत कॉलेज संचालकांनी वर्तविले आहे.- ऑनलाईन झालेल्या नोंदणीवरून लक्षात येते की कला, वाणिज्य, एमसीव्हीसी शाखा मराठी माध्यमाच्या अनुदानित जागा रिक्त राहणार आहेत. त्याचा परिणाम म्हणून कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती आहे. तसेच शाळेला जोडलेल्या मराठी माध्यमाच्या तुकड्या तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.डॉ. अशोक गव्हाणकरमहासचिव, विज्युक्टा

टॅग्स :Studentविद्यार्थीnagpurनागपूर