शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातून ‘फॉल्कन‘चा ‘नोझ कोन’ फ्रान्सला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 00:39 IST

फ्रान्सकडून राफेल युद्ध विमान खरेदी करारानुसार मिहानमध्ये सुरू झालेल्या दसॉल्ट रिलायन्स एअरोपेस या कारखान्यात ‘फॉल्कन-२०००’ या बिझनेस जेट विमानाच्या कॉकपिट समोरील भाग (नोझ कोन) तयार करण्यात आला. नोझ कोन शुक्रवारी कारखान्याच्या परिसरात झालेल्या एका समारंभात फ्रान्सच्या दसॉल्ट एव्हिएशनच्या अधिकाऱ्यांना निर्धारित वेळेपूर्वीच हस्तांतरित करण्यात आला. हा सुटा भाग फ्रान्समध्ये निर्मित फॉल्कन विमानांमध्ये बसविण्यात येणार असून फ्रान्सला रवाना करण्यात आला.

ठळक मुद्देटीना अंबानीतर्फे दसॉल्ट एव्हिएशनला सुटा भाग हस्तांतरित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : फ्रान्सकडून राफेल युद्ध विमान खरेदी करारानुसार मिहानमध्ये सुरू झालेल्या दसॉल्ट रिलायन्स एअरोपेस या कारखान्यात ‘फॉल्कन-२०००’ या बिझनेस जेट विमानाच्या कॉकपिट समोरील भाग (नोझ कोन) तयार करण्यात आला. नोझ कोन शुक्रवारी कारखान्याच्या परिसरात झालेल्या एका समारंभात फ्रान्सच्या दसॉल्ट एव्हिएशनच्या अधिकाऱ्यांना निर्धारित वेळेपूर्वीच हस्तांतरित करण्यात आला. हा सुटा भाग फ्रान्समध्ये निर्मित फॉल्कन विमानांमध्ये बसविण्यात येणार असून फ्रान्सला रवाना करण्यात आला.या प्रसंगी रिलायन्स समूहाच्या ग्रुप सीएसआर चेअरमन टीना अंबानी, रिलायन्स कॅपिटलचे संचालक अंशुल अनिल अंबानी, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी, दसॉल्ट रिलायन्स एअरोस्पेस लि.चे (डीआरएएल) संचालक फेड्रिक लेहरम, अ‍ॅन्थोनी जेशुडॅसन, रिचर्ड लाऊड, डीआरएएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी संपतकुमारन एसटी, मुख्य कार्यान्वय अधिकारी रॉबर्ट, डीआरएएल आणि एमएडीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.टीना अंबानी यांनी डीआरएएल नागपूरच्या युवा आणि तांत्रिक चमूचे अभिनंदन केले. पहिल्या कॉकपिटच्या नोझ कोनचे निर्मिती आंतरराष्ट्रीय एव्हिएशन स्टॅण्डर्डनुसार आणि वेळेपूर्वीच केली आहे. मिहान येथील कारखान्यात संपूर्ण पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यामुळे संपूर्ण फॉल्कन-२००० विमानांची निर्मिती मिहान येथे व्हावी, अशी अपेक्षा आहे. नागपुरात तयार होणारे सुटे भाग एकत्र जोडून कॉकपिट तयार करण्यात येणार आहे.मिहानमधील या कारखान्यात एप्रिल २०१८ पासून काम सुरू झाले. फॉल्कन- २००० या बिझनेस जेट विमानाचे एअरक्रॉफ्ट नोझ कोन तयार झाले आहेत. फ्रान्समध्ये फॉल्कन विमान सुसज्ज केले जाणार आहे. नागपुरात लवकरच सुटे भाग एकत्र जोडून कॉकपिट तयार करण्यात येणार आहे. मिहान-सेझमधील कारखान्यात २०२२ पर्यंत पूर्ण फॉल्कन विमान तयार होणार आहे. या कारखान्यात सध्या एक हँगर असून त्यात नोझ कोनचे उत्पादन सुरू आहे. येथे आणखी दोन हँगर तयार करण्यात येणार आहे.गोपनीयरीत्या कार्यक्रमाचे उद्घाटनकार्यक्रमाचे उद्घाटन गोपनीयरीत्या केल्यामुळे फ्रान्सच्या फॉल्कन-२००० विमानाच्या कॉकपिटसाठी लागणारा ‘नोझ कोन’ हा सुटा भाग मिहान-सेझमधील डीआरएएल कारखान्यात कमी वेळेत कसा तयार झाला, हा चर्चेचा विषय आहे. कारखान्याचे उद्घाटन झाले तेव्हा प्रसिद्धी माध्यमांना बोलविण्यात आले होते. पण कॉकपिटच्या सुट्या भागांच्या निर्मिती प्रक्रियेचे वृत्त गोपनीय ठेवले. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या अधिकाºयांनी ‘नोझ कोन’चे वृत्त प्रसिद्धी माध्यमांना रात्री उशिरा पाठविले.

 

टॅग्स :MihanमिहानFranceफ्रान्स