मुलाच्या अंत्यदर्शनासाठी पित्याची तगमग
By Admin | Updated: October 12, 2014 01:15 IST2014-10-12T01:15:42+5:302014-10-12T01:15:42+5:30
थकत्या वयातील आई-वडिलांचा तो आधार होता. दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. नेहमीप्रमाणे गुरुवारी सायंकाळी तो घराबाहेर पडला. रात्री जेवणाची वेळ झाली तरी तो परतला नाही. मध्यरात्र झाली

मुलाच्या अंत्यदर्शनासाठी पित्याची तगमग
बेवारस पुरलेल्या मृतदेहावर अखेर अंत्यसंस्कार
नरेश डोंगरे - नागपूर
थकत्या वयातील आई-वडिलांचा तो आधार होता. दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. नेहमीप्रमाणे गुरुवारी सायंकाळी तो घराबाहेर पडला. रात्री जेवणाची वेळ झाली तरी तो परतला नाही. मध्यरात्र झाली तरी त्याचा पत्ता नाही. स्वाभाविकपणे आई-वडिलांच्या जीवाला घोर लागला. रात्रभर इकडे-तिकडे चौकशी करूनही त्याच्याबद्दल कुणीच काही सांगायला तयार नव्हते. त्यामुळे आई-वडील आणि नातेवाईकांचीही काळजी वाढली. शुक्रवारी दिवसभर मित्रांकडे, आप्तांकडे, इकडे-तिकडे सर्वत्र शोध घेऊनही ‘त्याच्या’बद्दल कुणीच काही सांगायला तयार नव्हते. त्यामुळे आई-वडिलांचे अवसान गळाले. वडील आणि त्यांच्या आप्तस्वकीयांनी शुक्रवारी सायंकाळी सोनेगाव पोलीस ठाणे गाठले. ‘तो’ गुरुवारपासून बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पोलिसांनी ‘त्याचे’ वर्णन नोंदवून घेतले. वय, वर्ण, शरीरयष्टी याची चौकशी झाली. काय करीत होता, कोणते कपडे घालून होता, त्याचीही चौकशी झाली, अन् ‘तो’ बर्मुड्यावर होता, असे सांगताच पोलीस चमकले.
पोलिसांनी ‘त्याच्या’ कपड्याची माहिती नातेवाईकांना दिली. ती ऐकून नातेवाईकांच्या काळजाचा ठोका चुकला. कपडे तसेच होते. वय आणि शरीरयष्टीही तशीच होती. त्यामुळे ‘तो’ तोच असावा, असे जवळपास स्पष्ट झाले.