शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

मुलीला पोटगी देण्यास बापाचा नकार; न्यायालयाने ठणकावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 11:26 IST

हायकोर्टाने टोचले बापाचे कान : पाच हजारांची पोटगी कायम ठेवली

राकेश घानोडे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आईसोबत राहत असलेल्या मुलीला पाच हजार रुपये महिना पोटगी देण्यास विरोध करणाऱ्या बापाचे मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने कान टोचले. व्यक्तीच्या उदरनिर्वाहाची योग्य सोय करणे, हा पोटगीचा उद्देश आहे. त्यामुळे बापाला त्याच्या मुलीने जनावरासारखे जीवन जगावे, अशी अपेक्षा करता येणार नाही, असे न्यायालयाने ठणकावून सांगितले. प्रकरणातील बाप-मुलगी नागपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. मुलगी ११ वर्षे वयाची आहे. तिच्या आई-बापाने कौटुंबिक वादामुळे घटस्फोट घेतला आहे. मुलगी आईसोबत राहत आहे. बापाने तिच्या उदरनिर्वाहाची काहीच सोय केली नव्हती. त्यामुळे तिने कुटुंब न्यायालयात अर्ज दाखल करून बापाकडून पोटगी मागितली होती. कुटुंब न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता मुलीला पाच हजार रुपये मासिक पोटगी मंजूर केली. त्या निर्णयाविरुद्ध बापाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर उच्च न्यायालयाने पोटगीचा उदात्त हेतू स्पष्ट करून ही याचिका फेटाळून लावली. तसेच, बापाच्या डोळ्यांवरील झापडाही उघडल्या.

बापासोबत राहिली असती तर, मुलगी जसे जीवन जगली असती, तसेच जीवन आईसोबत राहत असतानाही जगण्याचा तिला अधिकार आहे. सध्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. त्यामुळे मुलीला मंजूर झालेली पोटगी वाजवी आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

वार्षिक उत्पन्न चार ते पाच लाखांचे, तरीही टाळाटाळ

  • बापाचा अमरावती रोडवरील बाजारगावात ढाबा आहे. त्याच्याकडे शेतजमीनही आहे. त्याचे वार्षिक आर्थिक उत्पन्न चार ते पाच लाख रुपयांचे आहे.
  • असे असताना त्याने, तो पाच हजार रुपये मासिक पोटगी देण्यास सक्षम नाही, असा दावा केला होता. न्यायालयाने तो दावा गुणवत्ताहीन ठरवला.
  • मुलीची आई खासगी नोकरी करीत असून तिला २० हजार रुपये मासिक वेतन मिळते. त्यातून ती स्वतःसह मुलीचे पालनपोषण करीत आहे. मुलीचे शिक्षण, वस्त्र व इतर दैनंदिन खर्चाचा भार उचलत आहे. मायलेकी हलाखीच्या आर्थिक परिस्थितीत जगत आहेत. न्यायालयाने या निर्णयात ही बाबही विचारात घेतली.
टॅग्स :nagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालय