शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! पोटच्या गोळ्याला विकून बापाने खरेदी केली बाईक, मोबाईल, म्युझिक सिस्टीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2022 11:33 IST

आरोपीनं मिळालेल्या पैशातून बाईक, म्युझिक सिस्टीम, दिवाण, कपडे आदि ऐशोआरामाच्या वस्तू खरेदी केल्या.

ठळक मुद्देदोन महिन्यांच्या मुलीला विकून चैनीच्या वस्तूंची खरेदी

नागपूर : नागपुरात एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. आपल्या दोन महिन्यांच्या मुलीची विक्री करून बापाने चक्क बाईक, मोबाईल, कुलर नवीन कपड्यांसह इतर चैनीच्या वस्तूंची खरेदी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी निर्दयी बापासह विक्रीसाठी मध्यस्थी करणाऱ्या महिलेला अटक केली आहे. उत्कर्ष दहिवले असे या निर्दयी बापाचे नाव आहे. मध्यस्थी करणारी आरोपी महिला उषा ही एका खासगी अनाथ आश्रमात काम करते. तर, उत्कर्ष नळफीटिंगची कामे करतो.

प्राप्त माहितीनुसार उत्कर्षने दुसरे लग्न केले. त्याच्या पत्नीला पहिल्या पतीपासून पाच वर्षांची मुलगी आहे. तर, उत्कर्षपासून तिला दुसरी मुलगी झाली, त्यामुळे उत्कर्ष नाराज होता. त्याने मुलीला विकण्याचा कट आखला, याला पत्नीने विरोधे केला पण आरोपीने पत्नी व मुलीला ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे मुलीच्या आईचा नाईलाज झाला. दरम्यान तो उषाच्या संपर्कात आला त्याने तिच्या माध्यमातून एका दाम्पत्याशी संपर्क साधला व मुलीची विक्री केली. उत्कर्षने १ लाख १० हजारांची मागणी केली. तर, उषा ही पेंदाम दाम्पत्याकडून परस्पर ३-५ लाख रुपये घेणार होती, अशी माहिती आहे.

आरोपीनं मिळालेल्या पैशातून बाईक, म्युझिक सिस्टीम, दिवाण, कपडे आदि ऐशोआरामाच्या वस्तू खरेदी केल्या. दरम्यान, पत्नीने १५ एप्रिलाला पाचपावली पोलिसात याप्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी उत्कर्ष व उषा सहारेला अटक केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnew born babyनवजात अर्भकnagpurनागपूर