शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

नागपुरात अपघातात वडिलांचा मृत्यू, मुली जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 20:30 IST

कंटेनर चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या दोन मुली गंभीर जखमी झाल्या. रविवारी दुपारी २ च्या सुमारास कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला.

ठळक मुद्दे कंटेनरची दुचाकीला धडक : कळमन्यात अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कंटेनर चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या दोन मुली गंभीर जखमी झाल्या. रविवारी दुपारी २ च्या सुमारास कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला.कन्हान येथील रहिवासी अरविंद विठ्ठलराव सांबरे हे मुलगी स्नेहा (६ वर्षे) आणि नयना (९ वर्षे) सह कळमन्यात सासऱ्याकडे आले होते. रविवारी दुपारी ते दुचाकीने साईनगरातून कन्हानकडे परत जायला निघाले होते. कळमन्याच्या चिखली चौकात मार्केटजवळ कंटेनर ट्रक चालक आरोपीने सांबरे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे खाली पडून तिघेही बापलेक गंभीर जखमी झाले. आजूबाजूच्यांनी धाव घेत जखमींना रामदेव बाबा हॉस्पिटलमध्ये पोहोचवले. तेथे डॉक्टरांनी अरविंद यांना मृत घोषित केले. स्रेहा आणि नयनाची प्रकृती गंभीर आहे. महिंद्रा विठ्ठलराव सांबरे (वय ३७) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अपघाताची नोंद केली. आरोपी कंटेनर चालकाची चौकशी सुरू आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू