शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

बाप रे बाप! वयाच्या १५व्या वर्षीच ‘दम मारो दम’; १५% विद्यार्थी हे मुख पूर्वकर्करोगाच्या उंबरठ्यावर

By संतोष हिरेमठ | Updated: May 31, 2024 06:47 IST

जागतिक तंबाखू विरोधी दिन: ५२ टक्के विद्यार्थी व्यसनात; मुली ४३ टक्के, तर मुले ५७ टक्के

संतोष हिरेमठ/सुमेध वाघमारे

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर/छत्रपती संभाजीनगर: वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षीच मुले-मुली तंबाखूजन्य पदार्थ, सिगारेटच्या व्यसनाला बळी पडत आहेत. एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. दरवर्षी ३१ मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन पाळण्यात येतो. एका संस्थेने राज्यातील ४ हजार विद्यार्थी-विद्यार्थिनींचे सर्वेक्षण केले. यातील १३ ते १५ वर्षे वयोगटातील ३,७६५ मुलांचा अहवाल विचारात घेण्यात आला. यातून ५.१ टक्के तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन करीत असल्याचे समोर आले. मुखकर्करोगाला तंबाखूजन्य पदार्थ कारणीभूत ठरतात.

१५% विद्यार्थी हे मुख पूर्वकर्करोगाच्या उंबरठ्यावर

  • राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे समुपदेशक योगेश सोळुंके म्हणाले की, ‘डब्ल्यूएचए’च्या अहवालानुसार धूम्रपान केल्याने रोज १४ जीव जातात. 
  • नागपुरात शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाने हाती घेतलेल्या तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत २३ हजार ८० विद्यार्थ्यांच्या मुखाची तपासणी केली असता, ५२ टक्के विद्यार्थ्यांना तंबाखूचे व्यसन असल्याचे आढळून आले. 
  • यात मुलींचे प्रमाण ४३ टक्के, तर मुलांचे प्रमाण ५७ टक्के आहे. धक्कादायक म्हणजे, यातील १५ टक्के विद्यार्थी हे मुख पूर्वकर्करोगाच्या उंबरठ्यावर आहेत. 

शाळेपासून जवळपास ५०० मीटर अंतरावर तंबाखू विक्रीवर प्रतिबंध असावा. याचे गंभीरतेने पालन होणे गरजेचे आहे. पालकांनीही मुलांसमोर तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करू नये. महत्त्वाचे म्हणजे मुलांना या वस्तू विकत आणण्यास सांगू नये.-डॉ. अभय दातारकर, अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर

तंबाखूमुळे फुप्फुसाचा कर्करोग, दीर्घकालीन ब्रोन्कायटिस, एमेम्सीसेमा, हृदयविकार, कर्करोग, ल्युकेमिया, मोतीबिंदू, टाइप-२ मधुमेह, न्यूमोनिया होण्याची शक्यता असते. त्यामुळे तंबाखूचे व्यसन टाळावे.- डॉ. निकिता गायकवाड, प्रकल्प अधिकारी, तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, मराठवाडा ग्रामीण विकास संस्था

आकडेवारी

  • खर्रा- २२.४%
  • तंबाखू- १४.५%
  • बिडी व सिगारेट- २.५%
  • सुपारी- २.४%
  • पान- १.७%
टॅग्स :Smokingधूम्रपानTobacco Banतंबाखू बंदीnagpurनागपूरAurangabadऔरंगाबादCigaretteसिगारेट