अपघातात पिता आणि मुलगी जखमी
By Admin | Updated: February 27, 2017 23:50 IST2017-02-27T23:50:41+5:302017-02-27T23:50:41+5:30
भरधाव कारचालकाने जोरदार धडक मारल्यामुळे दुचाकीवरील वडील आणि मुलगी जबर जखमी झाले. अरुण आसरे (वय ५९) आणि नमिता अरुण आसरे (वय २५) अशी जखमींची नावे आहेत.

अपघातात पिता आणि मुलगी जखमी
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि.27 - भरधाव कारचालकाने जोरदार धडक मारल्यामुळे दुचाकीवरील वडील आणि मुलगी जबर जखमी झाले. अरुण आसरे (वय ५९) आणि नमिता अरुण आसरे (वय २५) अशी जखमींची नावे आहेत.
प्रगतीनगर, जयताळा येथे राहणारे नमिता आणि तिचे वडील रविवारी सकाळी १०.१५ वाजता कूलरचे सामान घेण्यासाठी दुचाकीने हिंगण्याला जात होते. हिंगणा नाक्याजवळ त्यांना वेगात आलेल्या एका कारचालकाने दुचाकीला जोरदार धडक मारली. त्यामुळे अरुण आसरे यांच्या डोक्याला आणि खांद्याला तसेच नमितालाही ठिकठिकाणी मार लागला. त्यांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. पीयूष अरुण आसरे (वय २६) यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अपघातानंतर फरार झालेल्या कारचालकाचा शोध घेतला जात आहे.