शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-गोवा महामार्गाची गडकरींनी दिली नवी तारीख; म्हणाले, सर्व खटले मिटले...
2
मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार, कॉलही करणार; MPSC विद्यार्थ्यांच्या भेटीनंतर शरद पवार काय म्हणाले?
3
५५ हजारांवर येण्याचं स्वप्न भंगलं; एका दिवसात सोन्याच्या दरात १३०० रुपयांपेक्षा अधिक वाढ, नवे दर काय?
4
पुण्यातील १२ रुग्णालये नावालाच 'धर्मादाय'; नियम पायदळी तुडवले, उपचारावरून गरिबांना लुटले
5
IPL 2025 मध्ये फिक्सिंगचा प्रयत्न सुरू, खेळाडूंच्या कुटुंबीयांना केलं जातंय टार्गेट, मास्टरमाइंड कोण?
6
"आज आम्ही भोगतोय, वेळ बदलेल तेव्हा…’’ EDच्या चौकशीला हजर झालेल्या रॉबर्ट वाड्रांचं सूचक विधान   
7
"मुर्शिदाबादचा हिंसाचार सुनियोजित कट, घुसखोरांना का येऊ दिलं गेलं?"; ममतांचा सवाल
8
धमाल! आता WhatsApp वर तुम्ही ठेवू शकता मोठं स्टेटस; १ मिनिटाची लिमिट कितीने वाढवली?
9
डीअर क्रिकेट, गिव्ह मी वन मोअर चान्स! क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या करुण नायरची गोष्ट
10
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' स्टॉक, झुनझुनवालांकडे आहेत १३ कोटींपेक्षा अधिक शेअर; किंमत ₹९५ पेक्षा कमी 
11
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीपासून ॐकार साधना सुरू करा आणि अगणित लाभ मिळवा!
12
१०० कोटींची ऑर्डर! "१२०० फूट खोल खाणीत...", मुलीला शेवटचा मेसेज, लक्ष्मण शिंदेंची अपहरण करून हत्या
13
तुम्हाला श्रीमंत बनवणाऱ्या SIP चे १० सीक्रेट; कोट्यधीश होण्याचे गणित समजून घ्या
14
दीड लाखाचे व्याज माफ, म्हाडाचा निकाल; बिल्डरने आकारलेली वाढीव रक्कम रद्द करण्याची सूचना
15
"ड्रग्सच्या नशेत त्याने माझ्या ड्रेसला...", २९ वर्षीय अभिनेत्रीचा खळबळजनक आरोप; म्हणाली...
16
'हा' शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग, महिन्याभरात अर्धी झाली किंमत; आता SEBI ची मोठी कारवाई
17
IPL 2025: 'असंभव....'; चहलच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीनंतर RJ महावशची इन्स्टा स्टोरी अन् खास मेसेज 
18
प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, डिलीव्हरीच्या आदल्या दिवशी केलं फोटोशूट; जपानी भाषेत ठेवलं नाव
19
‘हनी ट्रॅप’पासून सावध राहा; गौरव पाटील प्रकरणात उच्च न्यायालयाचा इशारा
20
सतत जांभई येणं सामान्य गोष्ट नाही; मोठ्या आजाराचे असू शकतात संकेत, कसा टाळाल धोका?

कीटकनाशक फवारणी ठरतेय जीवघेणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 06:51 IST

शेतांमध्ये फवारणीची कामे सुरू आहेत. विदर्भात मात्र, कापूस व सोयाबीनवरील अळ्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेली कीटनाकशकांची फवारणी शेतकरी व शेतमजुरांनाच जीवघेणी ठरत आहे.

- सुमेध वाघमारे नागपूर : शेतांमध्ये फवारणीची कामे सुरू आहेत. विदर्भात मात्र, कापूस व सोयाबीनवरील अळ्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेली कीटनाकशकांची फवारणी शेतकरी व शेतमजुरांनाच जीवघेणी ठरत आहे. विदर्भात फवारणीमुळे आतापर्यंत ३१६ जणांना विषबाधा झाली आहे. त्यापैकी १0 जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून, शनिवारीही एक जण मरण पावला आहे. ही माहिती नागपूर मंडळाच्या आरोग्यसेवा उपसंचालकांनीच दिली. फवारणीमुळे विषबाधा झालेले सर्वाधिक रुग्ण व मृत्यू गोंदिया जिल्ह्यातील असल्याचे दिसून आले आहे.या वर्षी चांगला पाऊस, चांगली पिके आली. मात्र, किडीचा प्रादुर्भाव झाल्याने कीटकनाशक सुरू केलेली फवारणी शेतकरी व शेतमजुरांच्या जिवावर उठली आहे. गेल्या वर्षी यवतमाळ, अकोला, बुलडाणा, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, धुळे, नंदूरबार, जळगाव, नांदेड, अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यांतील सुमारे ३४ शेतकरी व २९ शेतमजूर फवारणीमुळे विषबाधेने मरण पावले होते. त्यानंतर, विषबाधा टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय हाती घेतले.कीटकनाशकांची फवारणी करताना शेतकरी व शेतमजुरांनी प्रतिबंधात्मक किट म्हणजेच हातमोजे, चश्मा, मास्क, टोपी, अ‍ॅप्रॉन, बूट आदींचा वापर कटाक्षाने करण्याच्या सूचना दिल्या. फवारणी करणाऱ्या शेतमजुरांना किट पुरविण्याचे व विषबाधा झाल्यास प्रथमोपचाराचे साहित्य शेतावर उपलब्ध ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले. तरीही यंदा विषबाधेचे रुग्ण वाढत आहेत.गेल्या वर्षी २२ मृत्यू, ९०० बाधितयवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षीही कीटकनाशक फवारणीतून विषबाधा होऊन २२ शेतकºयांचा मृत्यू झाला होता, तसेच ९०० पेक्षा अधिक शेतकी व शेतमजुरांना विषबाधा झाल्याने, यवतमाळच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते.>सात जणांवर उपचार सुरूभंडारा जिल्ह्यातील आठ, गोंदियातील १२३, गडचिरोलीतील दोन, चंद्रपूर जिल्ह्यातील पाच व वर्धा जिल्ह्यातील ३३ असे मिळून १७१ रुग्ण आहेत. यातील १५८ रुग्णांवर उपचार करून घरी पाठविण्यात आले. सात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यवतमाळमध्ये तीन महिन्यांत १०५ शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा झाल्याची नोंद सरकारी दप्तरी आहे.>दोघे अत्यवस्थनागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अतिदक्षता विभागात विषबाधा झालेले दोन रुग्ण अत्यवस्थ असून, एक जण व्हेंटिलेटरवर आहे. दोन्ही रुग्ण मध्य प्रदेशातील आहेत.