शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात भीषण अपघात; पुलावरुन खाली पडून चौघांचा मृत्यू, मृतांमध्ये २ चिमुकल्यांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2022 11:26 IST

सक्करदरा उड्डाणपुलावर अनियंत्रित कारने दोन दुचाकींना जबर धडक दिली.

नागपूर : नागपूरमधील सक्करदरा उड्डाण पुलावर भीषण अपघात झाला आहे. पुलावरून जाणाऱ्या एका कारने पुढील दोन दुचाकींना जबर धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की दुचाकीवर असलेले चौघेजण पुलाखाली फेकले गेले आणि त्यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये २ चिमुकल्या मुलांचा समावेश आहे.

माहितीनुसार, हा अपघात काल (दि. ९) रात्री सव्वादहाच्या सुमारास घडल्याचे सांगितले जात आहे. सक्करदरा परिसरात रात्री उशिरा पुलावरून जाताना अनियंत्रित कारने दोन दुचाकींना जोरात धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की एका दुचाकीवरील चौघे जण सुमारे ७० ते ८० फूट उंचीवरून उड्डाणपुलावरुन खाली रस्त्यावर फेकले गेले व त्यांचा मृत्यू झाला. विनोद पूनाजी खापेकर (४५), लक्ष्मी पुनाजी खापेकर (६५), वेदांत विनोद खापेकर (११) आणि विवान विनोद खापेकर (५)  सर्व रा. टिमकी अशी मृतांची नावे आहेत. 

शुक्रवारी रात्री महिंद्रा एसयुवी एम एच ४९, एएस चा चालक गणेश अरुण कडबे (३३, बुट्टीबोरी) याने दारूच्या नशेत खापेकर यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील खापेकर कुटुंबीय उड्डाणपुलाच्या खाली पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. कारचालकाने उड्डाण पुलावरील इतर तीन दुचाकींनाही धडक दिली यात मो. दानिश मो. मुनीर अंसारी (२०, राऊत नगर दिघोरी), मो. इलियास बरकत उल्ला अंसारी, कमरून निसार इलियास अंसारी (२०, अन्सार नगर मोमिनपुरा) आणि अयान इरफान अंसारी (४) हे जखमी झाले.

घटेनची माहिती समजताच सक्करदार पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या अपघातात दुचारीसोबतच कारचे देखील मोठे नुकसान झाले आहे. अपघातातील कार सक्करदरा येथील डेकोरेशन व्यावसायिकाची असल्याची माहिती आहे. पुढील तपास सकरदरा पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर