रुग्णाला न्याय मिळण्यासाठी उपोषण

By Admin | Updated: May 16, 2014 00:49 IST2014-05-16T00:49:49+5:302014-05-16T00:49:49+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णणालय (मेडिकल) आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर होणार्‍या कथित अन्यायाविरोधात युवक कॉँग्रेसने सुरू केलेले साखळी उपोषण गुरुवारी तिसर्‍या दिवशीही कायम होते.

Fasting to get justice for the patient | रुग्णाला न्याय मिळण्यासाठी उपोषण

रुग्णाला न्याय मिळण्यासाठी उपोषण

मेडिकल : युवक कॉँग्रेसकडे प्रशासनाच्या विरोधात तक्रारीचा पाऊस

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णणालय (मेडिकल) आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर होणार्‍या कथित अन्यायाविरोधात युवक कॉँग्रेसने सुरू केलेले साखळी उपोषण गुरुवारी तिसर्‍या दिवशीही कायम होते. या घडामोडीत रु ग्णांनी स्वत:हून प्रशासनाविरोधातल्या तक्र ारींचा पाढा आंदोलकांपुढे वाचला.

या दोन्ही रुग्णालयात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत उपचार घेणार्‍या लाभार्थी रुग्णांना प्रशासनाकडून वारंवार छळले जात आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये तर १ एप्रिलपासून औषध पुरवठा करणार्‍या पुरवठादाराने औषध देणेच बंद केले आहे. यामुळे ज्यांच्याजवळ पैसा आहे त्यांच्यावरच उपचार होत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. या शिवाय इतरही रु ग्णांना बाहेरून चाचण्या करून आणण्यास सांगणे, रक्तासाठी खासगी रक्तपेढीत पाठविणे, विशिष्ट औषधे दुकानात पाठविणे आदी सर्रास प्रकार सुरू आहेत. या विरोधात युवक कॉँग्रेसने सुपर स्पेशालिटीच्या प्रवेशद्वारासमोर हे आंदोलन पुकारले आहे.

बीपीएल कार्ड असतानाही त्याचा फायदा रुग्णांना मिळेनासा झाला आहे तर दुसरीकडे राजीव गांधी जीवनदायी योजनेचे गाजर दाखवून गरिबांना पदरचा पैसा खर्च करण्यास भाग पाडले जात आहे. या दोन्ही रुग्णालयात चतुर्थ कर्मचार्‍यांची कामे रुग्णांच्या नातेवाईकांनाच करावी लागतात.

सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील स्वच्छतेविषयी तर आलबेल कारभार आहे. रुग्ण अथवा त्यांच्या नातेवाईकांशी एकही डॉक्टर, कर्मचारी किंवा नर्स सौजन्याने वागत नाही. या सगळ्या बाबींचा परिणाम थेट रुग्णांच्या उपचारावर होत असल्याने गोरगरिब रुग्ण उपचारापासून वंचित राहत आहेत. त्या विरोधात युवक कॉँग्रेसने हे आंदोलन पुकारले आहे.

आजच्या साखळी उपोषणात युवक कॉँग्रेसचे चक्र धर भोयर, नागपूर लोकसभा युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष बंटी शेळके, अंदाज वाघमारे, सुरज चौकीकार, शेख अझहर, स्वप्नील बावनकर, जतिन चौकीकार, तबरेक आलम आदींचा सहभाग होता. (प्रतिनिधी)

Web Title: Fasting to get justice for the patient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.