शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

नागपुरात  अन्नदात्यासाठी अन्नत्याग  : किसानपुत्र आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 22:50 IST

किसानपुत्र आंदोलनाअंतर्गत यावर्षी पुन्हा एकदा जनमंचच्यावतीने अन्नदात्यासाठी अन्नत्याग हे एक दिवसाच्या उपोषणाचे लाक्षणिक आंदोलन येत्या १९ मार्च रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत महाराजबाग चौकातील डॉ. पंजाबराव देशमुख पुतळ्याजवळ आयोजित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देजनमंचतर्फे १९ मार्चला लाक्षणिक आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : किसानपुत्र आंदोलनाअंतर्गत यावर्षी पुन्हा एकदा जनमंचच्यावतीने अन्नदात्यासाठी अन्नत्याग हे एक दिवसाच्या उपोषणाचे लाक्षणिक आंदोलन येत्या १९ मार्च रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत महाराजबाग चौकातील डॉ. पंजाबराव देशमुख पुतळ्याजवळ आयोजित करण्यात आले आहे.नागपुरात जनमंच हे नागरिकांचे सर्वात मोठे व्यासपीठ आहे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना जनमंचचा मोठा आधार वाटतो. किसानपुत्र आंदोलकांचीही संस्था पालक आहे. गेल्या डिसेंबर महिन्यात किसानपुत्र आंदोलनाचे दुसरे राज्यस्तरीय शिबिर जनमंचने घेतले होते. तसेच गेल्यावर्षी सुद्धा १९ मार्चच्या उपोषणासाठी पुढाकार घेतला होता. यावर्षीही जनमंचने उपोषणाचे आवाहन केले असल्याचे किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी कळविले आहे.अन्नत्याग आंदोलन हे, साहेबराव करपे यांच्यासह आत्महत्या केलेल्या सर्व शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी, शेतकऱ्यांविषयी सहवेदना व्यक्त करण्यासाठी, शेतकऱ्यांविषयीची बांधिलकी बळकट करण्यासाठी, ज्या धोरणांनी शेतकऱ्यांना मरण पत्करावे लागते, त्या धोरणांचा निषेध करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या पायातील गुलामीच्या शृंखला तोडण्याता संकल्प करण्यासाठी आयोजित केले जाते. आपण धार्मिक उपवास खूप केले आता एक उपवास अन्नदात्यासाठी करूया. सार्वजनिक स्वरुपात उपोषण करता येत असेल तर जरूर करा. पण ते शक्य नसेल तर वैयक्तिकरीत्या उपवास करा, असे आवाहनही अमर हबीब यांनी केले आहे. यासोबतच जनमंचचे अध्यक्ष प्रा. शरद पाटील यांनीसुद्धा अन्नदात्यासाठी एक दिवस अन्नत्याग करून त्याला मानसिक व सामाजिक पाठबळ द्या. मी या आंदोलनात सहभागी होणार, आपणही यात सहभागी व्हा आणि बळीराजाला बळ द्या, असे आवाहन केले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagitationआंदोलन