शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

शेतकऱ्यांचा पाण्यासाठी ‘रास्ता रोको’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 23:23 IST

पावसाने दीर्घ काळ दडी मारल्याने पारशिवनी, रामटेक व मौदा तालुक्यातील धानाचे पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे पीक वाचविण्यासाठी पेंच प्रकल्पाचे पाणी ओलितासाठी तात्काळ सोडावे, या मागणीसाठी शेतकरी शेतमजूर संघर्ष समितीच्यावतीने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्या नेतृत्वात कन्हान नजीकच्या नागपूर-जबलपूर महामार्गावरील डुमरी परिसरात शुक्रवारी ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

ठळक मुद्देपेंच प्रकल्पाचे पाणी सोडा : नागपूर - जबलपूर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पावसाने दीर्घ काळ दडी मारल्याने पारशिवनी, रामटेक व मौदा तालुक्यातील धानाचे पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे पीक वाचविण्यासाठी पेंच प्रकल्पाचे पाणी ओलितासाठी तात्काळ सोडावे, या मागणीसाठी शेतकरी शेतमजूर संघर्ष समितीच्यावतीने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्या नेतृत्वात कन्हान नजीकच्या नागपूर-जबलपूर महामार्गावरील डुमरी परिसरात शुक्रवारी ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.पावसाने दडी मारल्याने पारशिवनी, रामटेक व मौदा तालुक्यातील धानाचे पीक सुकायला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, या तिन्ही तालुक्यात धानाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात असून, याच पिकावर शेतकऱ्यांची खरी भिस्त आहे. वारंवार मागणी करूनही प्रशासन पेंच प्रकल्पाचे पाणी कालव्यात ओलितासाठी सोडत नसल्याने तसेच प्रशासन पर्यायी व्यवस्था करायला तयार नसल्याने या तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांनी शुक्रवारी सकाळी ९ वाजता नागपूर-जबलपूर महामार्गावरील डुमरी शिवारातील अण्णा मोड येथे शेतकरी शेतमजूर संघर्ष समितीच्या बॅनरखाली ‘रास्ता रोको’ करायला सुरुवात केली. या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी केले.हे आंदोलन दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू होते. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात प्रचंड नारेबाजी केली. यावेळी राजेंद्र मुळक यांच्यासह अन्य नेत्यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले. प्रत्येकाने शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांवर सडकून टीका केली.१२ आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखलया रास्ता रोको आंदोलनात सहभागी होणाऱ्या १२ आंदोलकांविरुद्ध कन्हान पोलिसांनी भादंवि ३४१, १४३, १४९, मुंबई पोलीस कायदा १३५ अन्वये गुन्हे दाखल केले. त्यात जीवन मंगळे, रमेश कारेमोरे, घनश्याम निंबोने, सूर्यभान टोंतफु, प्रकाश सुखदेव, श्रीनिवास सुब्बाराव, भाऊराव कोकाटे, मुकेश यादव, सूरजलाल जमकुरे, अमोज वानखेडे, श्रीकांत बावनकुळे, सायबा बरबटे यांचा समावेश आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagitationआंदोलन