शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

शेतकऱ्यांना पंप, विद्यार्थ्यांना सायकल, तर बेरोजगारांना ई-रिक्षा मिळणार

By गणेश हुड | Updated: April 22, 2023 17:48 IST

जि.प.च्या समाजकल्याण समितीच्या बैठकीत निर्णय

नागपूर : मागासवर्गीय घटकातील विद्यार्थ्यांना सायकल वाटप, शेतकऱ्यांना विद्युत मोटारपंप, महिलांना शिलाई मशीन पुरविणे, तर मागासवर्गीय बेरोजगार युवकांना ई-रिक्षा वाटप करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीच्या बैठकीत शुक्रवारी घेण्यात आला.

विभागाच्या विकासकामांच्या निधीबाबत सदस्यांच्या तक्रारींवर समिती सभापती मिलिंद सुटे यांनी यशस्वीपणे तोडगा काढला. त्रुटी दूर करून योग्य प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना केल्या. काही सदस्यांनी २० टक्के निधी व दलितवस्ती विकास योजनेचा निधी मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर सुटे यांनी कुणावरही अन्याय होणार नसल्याची ग्वाही दिली.

निधी खर्च करण्यासह याद्या अंतिम करण्यासाठी कमी वेळ होता. काही प्रस्ताव निर्धारित नमुन्यात नव्हते, तर काहींसोबत सदस्यांचे पत्र लागले नव्हते. त्यामुळे प्रस्ताव मंजूर करताना अडचणी होत्या. त्रुटी दूर करून प्रस्तावांना अंतिम मंजुरी देण्यात आली. येत्या वर्षाचे नियोजन करताना सदस्यांची संमती मिळेल. प्रस्ताव योग्य पाठवावेत, अशा सूचना त्यांनी केल्या.पदमान्यतेसाठी पैशाची मागणी?

समाजकल्याण विभागांतर्गत मूक-बधिर व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळा अनुदानावर आल्या आहेत. या शाळांवरील शिक्षक व कर्मचाऱ्यांची आधीच भरती केलेल्या पदांना मान्यता (अप्रूव्हल) देण्यासाठी  अधिकाऱ्यांकडून लाखों रुपयांची मागणी केली जात असल्याची दबक्या आवाजात सदस्यांत चर्चा होती. समितीच्या पुढील बैठकीत याचा  स्फोट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnagpurनागपूर