बिल थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांची वीज कापणार नाही

By Admin | Updated: May 25, 2017 02:02 IST2017-05-25T02:02:25+5:302017-05-25T02:02:25+5:30

राज्य सरकार कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांकडून थकीत वीज बिलाची वसुली सक्तीने करणार नाही.

The farmers who are tired of the bill will not be able to power | बिल थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांची वीज कापणार नाही

बिल थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांची वीज कापणार नाही

चंद्रशेखर बावनकुळे : २२ हजार कोटींची थकबाकी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य सरकार कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांकडून थकीत वीज बिलाची वसुली सक्तीने करणार नाही. तसेच कोणत्याही शेतकऱ्याचे वीज कनेक्शन कापणार नसल्याची ग्वाही ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यातील शेतकऱ्यांकडे २२ हजार कोटींचे वीज बिल थकीत आहे. व्याज आणि दंड वजा करता १४ हजार कोटी रुपये होतात. शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी पाच हप्ते पाडून देण्यात आले आहेत. प्रत्येक तीन महिन्यांनी त्यांनी हप्ता भरावा अशा प्रकारे थकबाकी भरण्यासाठी १५ महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
कोराडी आणि परळी येथील वीज निर्मिती संचातील बिघाडामुळे वीज निर्मितीवर फारसा फरक पडलेला नाही. राज्यातील खासगी वीजनिर्मिती प्रकल्प अदानीकडून १२०० मेगावॅट आणि इंडिया बुल्सकडून ५०० मेगावॅट वीज मिळत आहे.
महावितरणला मागील १५ दिवसात अडचण निर्माण झाली होती. पण ती आता दूर करण्यात आल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

Web Title: The farmers who are tired of the bill will not be able to power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.