शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
2
“सगळीकडे हीच चर्चा, मतचोरीविरोधात जनता राहुल गांधींसोबत, संपूर्ण देश म्हणणे ऐकतोय”: काँग्रेस
3
महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार...
4
बर्फाळ टेकडीवर वसलाय 'हा' छोटासा देश! स्वतःचा झेंडा, ध्वज आणि पासपोर्टची सुविधा देखील उपलब्ध; तुम्हाला माहितीये का?
5
१२ लाखांपर्यंतची करसवलत रद्द होणार का? नव्या आयकर विधेयकावरुन सरकारने केला खुलासा
6
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅम GOLD साठी किती खर्च करावा लागणार?
7
"जोपर्यंत लोकांच्या मनात निवणुकीच्या निष्पक्षतेबाबत संशय राहील तोपर्यंत...’’, शशी थरूर यांचं विधान  
8
ही कसली आई! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी स्वतःच्या ५ महिन्यांच्या लेकीची केली हत्या
9
"हे देवा, त्यांनी आता बोलणं थांबवावं", डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत सनी लिओनीचं स्पष्ट मत, म्हणाली- "त्यांच्या काही गोष्टी..."
10
Turkey Earthquake: तुर्कीत ६.१ रिश्टर स्केलचा भूकंप, २० सेकंदाचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
11
जुही बब्बरने भावाला बांधली राखी, प्रतीक बब्बरची अनुपस्थिती; भावुक पोस्ट करत म्हणाली...
12
Navi Mumbai: नेरुळमधील सुश्रुषा हाॅस्पिटलला आग, रुग्णांची सुखरूप सुटका
13
मौतका कुआ : बापाचा 'लाडला', जोरदार पडला...! स्टंट करणं पडलं भारी, दिवसाढवळ्या दिसले असतील तारे; VIDEO व्हायरल
14
कुत्रा, मांजर विसरा..; विद्यार्थ्याने शाळेत आणला हत्ती, पाहून सर्वांनाच बसला धक्का; पाहा video
15
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
16
NSDL Share Price: 'या' IPO चे गुंतवणुदार झाले मालामाल; ४ दिवसांत ७८% चा छप्परफाड रिटर्न; लिस्टिंगनंतर लागला जॅकपॉट
17
“कविता करना बंद किया क्या?”; PM मोदींनी केली आठवलेंना विचारणा, तत्काळ पूर्ण केली इच्छा
18
VIDEO: दोन सिंहांचा सुरु होता मुक्त संचार, अचानक समोरून आला 'किंग कोब्रा' अन् मग...
19
माधुरी हत्तीबाबत सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट! हत्ती कोल्हापूरला येणार की वनतारामध्ये राहणार?
20
तब्बल ७०० वर्ष जगले दक्षिणेतले संत राघवेंद्र स्वामी; पण कसे? त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या!

अर्ध्या एकरच्या सातबारासाठी शेतकऱ्याची फरफट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 21:30 IST

हक्काच्या शेतीचा सातबारा मिळविण्यासाठी एक शेतकरी गेल्या १७ वर्षापासून प्रशासनाचे उंबरठे झिजवितो आहे. परंतु प्रशासकीय पेचात त्याचा सातबारा कुठे अडकलाय, याबाबत कुणीही त्याचे समाधान करू शकले नाही. हक्काच्या शेतीसाठी उंबरठे झिजविताना तो हतबल झाला आहे. त्याच्यावर झालेल्या कर्जामुळे ते फेडण्यासाठी स्वत:चे अवयव विकण्याचा निर्णय त्याने घेतला आहे.

ठळक मुद्देप्रशासनाच्या चकरा मारून हतबल : कर्ज फेडण्यासाठी अवयव विकण्याचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : हक्काच्या शेतीचा सातबारा मिळविण्यासाठी एक शेतकरी गेल्या १७ वर्षापासून प्रशासनाचे उंबरठे झिजवितो आहे. परंतु प्रशासकीय पेचात त्याचा सातबारा कुठे अडकलाय, याबाबत कुणीही त्याचे समाधान करू शकले नाही. हक्काच्या शेतीसाठी उंबरठे झिजविताना तो हतबल झाला आहे. त्याच्यावर झालेल्या कर्जामुळे ते फेडण्यासाठी स्वत:चे अवयव विकण्याचा निर्णय त्याने घेतला आहे.या पीडित शेतकऱ्याचे नाव सागर मंदरे आहे. उमरेड तालुक्यातील मकरधोकडा येथील रहिवासी आहे. त्याची वडिलोपार्जित ७ एकर जमीन होती. आर्थिक परिस्थिती बरी नसल्यामुळे वडिलांनी सन १९८९ साली ८५ आर, १९९४ साली ९७ आर आणि १९९५ साली ८१ आर जमीन विकली. शेवटी त्यांच्या जवळ २० आर जमीन शिल्लक राहिली. सागर मंदरे १९९६ पासून त्यांच्याकडे शिल्लक जमिनीच्या सातबाराची मागणी प्रशासनाकडे करतो आहे. आपल्या जमिनीचा सातबारा मिळवण्यासाठी तो १७ वर्षापासून प्रशासनाचे उंबरठे झिवजत आहे. गावातील पटवाऱ्याकडे त्याने सातबारा मागितला असता देण्यास नकार दिला. म्हणून त्याने उमरेडचे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दाद मागितली. तेव्हा त्यांनी ताबा वहीवर नोंद नसल्याचे सांगून रिकाम्या हाताने परतवून लावले. त्यानंतर त्याने अप्पर आयुक्तांकडे दाद मागितली. त्यांनीही उपविभागीय अधिकाऱ्याचा आदेश कायम ठेवला. त्यानंतर त्यांनी मुंबई येथे मंत्रालयात जाऊन महसूल विभागात आपली व्यथा सांगितली. महसूल विभागाने नागपूर जिल्हाधिकाऱ्यांना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकरणाची शहनिशा न करता पुनर्मोजणीमध्ये जमीन गेल्याचा अहवाल देऊन महसूल विभागाचा आदेश फेटाळल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे. ते परत जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाविरुद्ध अप्पर आयुक्तालयात गेले. परंतु त्यांनीही जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कायम ठेवला. प्रशासनाने न्यायच नाकारल्याने सागर मंदरे हतबल झाले आहे. घरी दोन मुले, वृद्ध वडील असा प्रपंच आहे. प्रशासनाच्या निर्णयाने आता जमीन मिळणार नाही, त्यामुळे तो हतबल झाला आहे. झालेले कर्ज फेडता येईल, या भावनेतून शरीराच्या अवयवाची विक्री करण्याचा निर्णय त्याने घेतला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीnagpurनागपूर