शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी बांबू शेतीतून मिळवावी समृद्धी : ६०० रोपट्यांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 20:15 IST

देशभरात बांबूच्या १५० प्रजाती आहेत आणि मोठ्या संख्येत शेतकरी बांबू लागवडीकडे वळले आहेत. अ‍ॅग्रो फॉरेस्ट्री वृक्षारोपण हा शेतीचा नवा ट्रेंड आहे. शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीच्या ३० टक्के भागावर तरी बांबू लागवड करावी व समृद्धी प्राप्त करावी, असे आवाहन तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

ठळक मुद्दे कृषी महाविद्यालयाचा बांबू महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशभरात बांबूच्या १५० प्रजाती आहेत आणि मोठ्या संख्येत शेतकरी बांबू लागवडीकडे वळले आहेत. अ‍ॅग्रो फॉरेस्ट्री वृक्षारोपण हा शेतीचा नवा ट्रेंड आहे. शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीच्या ३० टक्के भागावर तरी बांबू लागवड करावी व समृद्धी प्राप्त करावी, असे आवाहन तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. शेतकऱ्यांनीच नाही तर बेरोजगार तरुणांनी बांबू शेतीतून रोजगार प्राप्त करावा, असेही मत व्यक्त करण्यात आले.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय, नागपूरच्या वतीने जागतिक बांबू दिनानिमित्त तीन दिवसाच्या बांबू महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यात वेगवेगळ्या उपक्रमातून शेतकऱ्यांना बांबू शेतीबाबत उपयुक्त मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शेतकऱ्यांना बांबूच्या ६०० रोपट्यांचे वितरण करण्यात आले.कृषी महाविद्यालयाच्या एआयसीआरपी येथे आयोजित हा महोत्सव सोशल फॉरेस्ट्री सर्कल, सोशल फॉरेस्ट्री डिव्हिजन, नागपूर आणि एआयसीआरपी, पीडीकेव्ही कॉलेज ऑफ अ‍ॅग्रिकल्चर यांच्या वतीने करण्यात आला. कॉलेजचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. डी.एम. पंचभाई, वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर, उपवनसंरक्षक गीता नन्नावरे, वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. व्ही.एम. इलोरकर, कृषी महाविद्यालय, अकोलाचे संशोधन संचालक डॉ. व्ही.के. कचारे, केंद्रीय कृषी वन संशोधन संस्था, झांशीचे प्रकल्प संचालक डॉ. आर.के. तिवारी आणि वेगवेगळ्या भागातून आलेले शेतकरी उपस्थित होते. क्रॉफ्ट इंडस्ट्रीपासून बांधकाम क्षेत्रापर्यंत असलेले बांबूचे महत्त्व यावेळी तज्ज्ञांनी समजावून सांगितले. बांबू लागवडीबाबत मार्गदर्शनही करण्यात आले. तीन दिवस हा महोत्सव चालला आणि या तीन दिवसात देशभरातील तज्ज्ञांनी विद्यार्थी व शेतकºयांना मार्गदर्शन केले.

टॅग्स :Farmerशेतकरीnagpurनागपूर