शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खरेदीनंतर शेतकऱ्यांना त्वरित रक्कम मिळावी : स्वदेशी जागरण मंचची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 01:08 IST

एकीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित भारतीय किसान संघाने कृषी विधेयकावर नाराजी व्यक्त केली असताना संघ परिवारातीलच इतर संघटनांकडूनदेखील विविध प्रतिक्रिया येत आहेत. स्वदेशी जागरण मंचने विधेयकाचे स्वागत केले असले तरी काही शंकादेखील उपस्थित केल्या आहेत.

ठळक मुद्देकृषी विधेयकाचे स्वागत, मात्र शंकादेखील केल्या उपस्थित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित भारतीय किसान संघाने कृषी विधेयकावर नाराजी व्यक्त केली असताना संघ परिवारातीलच इतर संघटनांकडूनदेखील विविध प्रतिक्रिया येत आहेत. स्वदेशी जागरण मंचने विधेयकाचे स्वागत केले असले तरी काही शंकादेखील उपस्थित केल्या आहेत. नव्या तरतुदीनुसार कोणताही खरेदीदार जेव्हा पॅनकार्ड दाखवून शेतकऱ्यांकडून खरेदी करू शकतो तेव्हा शेतकऱ्याचे उत्पादन उचलल्यानंतर लगेचच त्याला रक्कम मिळाली पाहिजे किंवा सरकारने देय रक्कम देण्याची हमी दिली पाहिजे, अशी भूमिका मंचतर्फे मांडण्यात आली आहे.हे विधेयक लागू करण्याचा सरकारचा हेतू योग्य आहे. ‘शेतकरी’ उत्पादन, व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि सुलभता) विधेयक, २०२०’’ याचा उद्देश मध्यस्थांच्या अनुपस्थितीत शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांकरिता योग्य भाव मिळावा असा असल्याचा जाणवतो. परंतु ‘मंडी फी’ नसल्यास ग्राहक एपीएमसी मार्केटमधून खरेदी करण्यास स्वाभाविकपणे प्रोत्साहित होतील. अशा परिस्थितीत कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मंड्यांना यापुढे खासगी विक्रेते पसंत करणार नाहीत आणि शेतकऱ्याला सुद्धा एपीएमसी मंडईबाहेर विक्री करण्यास भाग पाडले जाईल. अशा परिस्थितीत बड्या खरेदी कंपन्या शेतकऱ्यांचे शोषण करू शकतात, अशी शंका स्वदेशी जागरण मंचतर्फे उपस्थित करण्यात आली आहे.एपीएमसी मार्केटबाहेर खरेदी करण्यास परवानगी दिली जाते तेव्हा शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीची (एमएसपी) हमी देणे आवश्यक आहे आणि एमएसपीच्या दरांखाली खरेदी बेकायदेशीर घोषित केली जाणे आवश्यक आहे. फक्त सरकारच नाही, खासगी पक्षांनाही एमएसपीपेक्षा कमी किमतीत खरेदी करण्यास मनाई केली गेली पाहिजे, असे मत स्वदेशी जागरण मंचचे राष्ट्रीय परिषद सदस्य धनंजय भिडे यांनी व्यक्त केले आहे.उत्पादन विकण्यासाठी अधिक पर्याय असावेशेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन विकण्यासाठी अधिक पर्याय असावेत. जर एखादी मोठी कंपनी किंवा काही कंपन्यांचा वरचष्मा असेल तर गरीब    शेतकऱ्याच्या मोलभाव करण्याच्या शक्तीवर त्याचा वाईट परिणाम होईल. यापूर्वी २२ हजार कृषी मंडळे स्थापन केल्या जातील, असा सरकारने दावा केला होता. ही योजना लवकर पूर्ण केली जावी, असेदेखील स्वदेशी जागरण मंचतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.शेतकऱ्यांना न्याय मिळणार कसाकंत्राटी शेतीच्या व्यवसायात गुंतलेल्या शेतकऱ्यांसाठी वादविवादाचे निराकरण करण्याची यंत्रणा असावी. कंत्राटी शेतीशी संबंधित ‘शेतकरी’ (सबलीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा विधेयक, २०२० या द्वारा प्रस्तावित केलेली ‘तंटा निराकरण यंत्रणा’ शेतकऱ्यांसाठी अत्यंत गुंतागुंतीची आहे. कामाचे आधीच मोठे ओझे असलेल्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना वाद निराकरणात मुख्य भूमिका देण्यात आली आहे. यामुळे वाद झाल्यास शेतकऱ्यांना न्याय मिळविणे अत्यंत अवघड जाईल का असा प्रश्न मंचतर्फे उपस्थित करण्यात आला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी