लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील २३ हजार ४११ शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून त्यांच्या खात्यात २०७.०४ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची घोषणा केली. दोन लाख रुपयापर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांनाच लाभ देण्याचे आदेश काढले. सरकारने दोन लाखांवरील शेतकऱ्यांसोबत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही मदत देण्याचे जाहीर केले आहे. कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचे अर्ज मागविण्यात आले नाही. बँकांकडूनच यादी घेण्यात आली.सरकारने लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या असून त्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यात ४० हजार ९० शेतकरी पात्र ठरले आहेत. यातील ३१ हजार २३० शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले. आतापर्यंत २३ हजार ४११ शेतकऱ्यांच्या खात्यात २०७ कोटी ४ लाखांची रक्कम जमा करण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
नागपूर जिल्ह्यातील २३ हजारावर शेतकरी कर्जमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 22:35 IST
महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील २३ हजार ४११ शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून त्यांच्या खात्यात २०७.०४ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.
नागपूर जिल्ह्यातील २३ हजारावर शेतकरी कर्जमुक्त
ठळक मुद्दे२०७ कोटी रुपये खात्यात जमा