आॅनलाईन लोकमतनागपूर : महत्त्वाकांक्षी प्रकल्प नागपूर -मुंबई समृद्धी महामार्गासाठी संपादित महानगर क्षेत्रातील जमिनीचा पाचपट मोबदला मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी राज्य शासनाने पूर्ण केली आहे. यासंदर्भात २४ नोव्हेंबर २०१७ रोजी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. परिणामी, हिंगणा तालुक्यातील ४१ शेतकऱ्यांची या मागणीविषयीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निकाली काढली आहे.१९९९ मध्ये हिंगणा तालुक्याला महानगर क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. शासनाने २६ मे २०१५ रोजी अधिसूचना जारी करून महानगर क्षेत्रातील कृषी जमिनीकरिता १ गुणांक घोषित केला होता. त्यामुळे हिंगणा तालुक्यातील जमिनीला केवळ अडीचपट मोबदला देय असल्याचे शासनाचे म्हणणे होते. त्यावर याचिकाकर्त्या शेतकऱ्यांचा आक्षेप होता. ग्रामीण भागातील जमिनीप्रमाणे पाचपट मोबदला मिळावा अशी त्यांची मागणी होती. शासन तांत्रिक कारणावरून मोबदल्यात भेदभाव करू शकत नाही असा दावा त्यांनी केला होता. ही याचिका प्रलंबित असतानाच शासनाने शेतकऱ्यांची मागणी पूर्ण केली. याचिकाकर्त्यांमध्ये हिंगणा तालुक्यातील सुकळी, वायफळ, पिपळधरा, दाताळा, सालई दाभा, बोरगाव रिठी, हळदगाव इत्यादी गावांतील शेतकऱ्यांचा समावेश होता. दहा जिल्ह्यांतून जात असलेल्या समृद्धी महामार्गाकरिता सरळ खरेदी पद्धतीने भूसंपादन केले जात आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. प्रदीप क्षीरसागर यांनी बाजू मांडली.
महानगरातील शेतकऱ्यांनाही मिळणार जमिनीचा पाचपट मोबदला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 21:06 IST
महत्त्वाकांक्षी प्रकल्प नागपूर -मुंबई समृद्धी महामार्गासाठी संपादित महानगर क्षेत्रातील जमिनीचा पाचपट मोबदला मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी राज्य शासनाने पूर्ण केली आहे. यासंदर्भात २४ नोव्हेंबर २०१७ रोजी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. परिणामी, हिंगणा तालुक्यातील ४१ शेतकऱ्यांची या मागणीविषयीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निकाली काढली आहे.
महानगरातील शेतकऱ्यांनाही मिळणार जमिनीचा पाचपट मोबदला
ठळक मुद्देसमृद्धी महामार्गासाठी संपादन : हायकोर्टातील याचिका निकाली