रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:08 IST2020-12-26T04:08:02+5:302020-12-26T04:08:02+5:30

रामटेक : पिकाची पाहणी करण्यासाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्यावर झुडपात दबा धरून बसलेल्या रानडुकराने अचानक हल्ला चढविला. त्यात शेतकरी ...

Farmers injured in bullfight | रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

रामटेक : पिकाची पाहणी करण्यासाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्यावर झुडपात दबा धरून बसलेल्या रानडुकराने अचानक हल्ला चढविला. त्यात शेतकरी गंभीर जखमी झाला. ही घटना रामटेक पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील किरणापूर शिवारात शुक्रवारी (दि. २५) सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली.

रामलाल गाविंदा उईके (५२, रा. काचूरवाही, ता. रामटेक) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. रामलाल यांची किरणापूर शिवारात शेती असून, त्यांनी गव्हाची पेरणी केली आहे. गव्हाला ओलित करणे सुरू असल्याने ते शुक्रवारी सकाळी पाणी देण्यासाठी शेतात गेले हाेते. त्यातच काही कळण्याच्या आत जवळच असलेल्या झुडपात दबा धरून बसलेल्या रानडुकराने त्यांच्यावर हल्ला चढविला. त्यात त्यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. ही बाब लक्षात येताच परिसरातील शेतकऱ्यांनी रानडुकराला पिटाळून लावले आणि रामलाल यांना रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. तिथे प्रथमाेपचार केल्यानंतर त्यांना नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

Web Title: Farmers injured in bullfight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.