शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनाे, धुळ पेरणीची करू नका घाई; तुर्तास मान्सून कमकुवत राहण्याची शक्यता

By निशांत वानखेडे | Updated: June 14, 2023 18:08 IST

विदर्भात पाच दिवस उष्ण लाटेसारखी स्थिती

नागपूर : नैऋत्य मान्सूनच्या आगमनाची चाहुल लागल्याने शेतकरी बांधवांनाही पेरणीची घाई झाली आहे. गेल्या वर्षीच्या पावसामुळे असलेला जमिनीचा ओलावा पाहून शेतकरी धुळ पेरणीची तयारी करीत आहेत. मात्र सध्यातरी मान्सून अधिक सक्रिय झाला नसून त्याची स्थिती कमकुवत आहे. त्यामुळे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी धुळपेरणीची घाई करू नये किंवा पेरणी टाळावी, असा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.

निवृत्त हवामान अधिकारी माणिकराव खुळे यांनी सध्याच्या हवामानाच्या स्थितीचे अवलोकन करीत शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. त्यांच्या मते केरळहून निघालेल्या मान्सूनचे ४ दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे प्रवेशद्वारे म्हणजे सिंधूदुर्गात आगमन झाले होते. मात्र त्याच्या मार्गक्रमणात कोणतीही प्रगती झाली नसून आहे त्याच स्थितीत खिळला आहे. ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचाही मान्सूनच्या मार्गक्रमणावर सकारात्मक परिणाम झाला नाही. त्यामुळे विदर्भात स्थिती विपरित आहे. ढगाळ वातावरणामुळे किरकोळ पाऊस होत असला तरी तो मान्सूनचा पाऊस नाही. उलट पुढचे पाच दिवस म्हणजे १९ जूनपर्यंत विदर्भात उष्ण लाटेसारखी स्थिती राहणार असल्याची शक्यता खुळे यांनी व्यक्त केली. 

ढगाळ वातावरण असले तरी दिवसाचा पारा ४२ अंशाच्या आसपास कायम आहे. ही स्थिती शेतकऱ्यांसाठी अनुकूल नाही. २० जूनच्या आसपास सुरु होणाऱ्या मोसमी पावसातून २३ ते ३० जून दरम्यान शेवटच्या आठवड्यात पेरणीयोग्य अश्या पावसाची अपेक्षा करता येऊ शकते. अशावेळी जमिनीचा ओलावा ८ इंचपर्यंत असेल तरच पेरणीचा विचार शेतकऱ्यांनी करावा. अन्यथा थोडी प्रतीक्षा करूनच पेरणीचा विचार करावा, असे आवाहन खुळे यांनी केले.

अल-निनो सक्रिय, आयओडीवर भिस्त

दरम्यान पावसाला रोखणारा अल-निनो १५ जुलैनंतर सक्रिय होण्याचा अंदाज होता पण ‘नोआ’ या अमेरिकन हवामान संस्थेनुसार अल-निनो आताच विकसित झाला आहे. त्यामुळे १५ जुलैपर्यंत अपेक्षित पाऊस कोसळण्याची शक्यताही कमीच वाटत आहे. जूनमध्ये आतापर्यंत मान्सून ५० टक्के सरासरीही गाठू शकला नाही. त्यामुळे आता पावसासाठी पूर्ण भिस्त इंडियन ओशन डायपोल (आयओडी) यावर अवलंबून असल्याचे माणिकराव खुळे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :environmentपर्यावरणweatherहवामानthunderstormवादळFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र