गो-संवर्धनातून शेतकऱ्यांचा विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2015 03:00 IST2015-07-08T03:00:23+5:302015-07-08T03:00:23+5:30
कीटकनाशके, रासायनिक खते यामुळे पारंपरिक शेतीचा ऱ्हास होत आहे. तंत्रज्ञानाच्या उपयोगामुळे शेतीपयोगी जनावरांची उपयोगिता कमी होत आहे.

गो-संवर्धनातून शेतकऱ्यांचा विकास
मंगेश व्यवहारे नागपूर
कीटकनाशके, रासायनिक खते यामुळे पारंपरिक शेतीचा ऱ्हास होत आहे. तंत्रज्ञानाच्या उपयोगामुळे शेतीपयोगी जनावरांची उपयोगिता कमी होत आहे. शेतीत आलेल्या आधुनिकतेचा दुष्परिणाम शेतकऱ्यांवर होत आहे. अशा परिस्थितीत गो-विज्ञान अनुसंधान केंद्राने दिशादर्शक प्रकल्प हाती घेतला आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास साधण्याचा प्रयत्न केंद्राचा आहे. तसेच मानवी आरोग्याच्या संदर्भात केंद्राने अलौकिक कार्य केले आहे. केंद्राने निर्माण केलेल्या पाच औषधांना अमेरिका व चीन कडून पेटेंट मिळाले आहे.
पशुसंवर्धनाचा संदेश देणारी आणि गोवंशाची मानवी जीवनातील उपयुक्तता पटवून सांगणारी ही संस्था आहे. जिल्ह्यातील देवलापार येथे असलेले हे केंद्र देशातील झोनल पायलट केंद्र आहे. या केंद्राने शेतकऱ्यांचा शेतीवर वाढलेला खर्च कमी करण्यासाठी गोपालनाची संकल्पना राबविली आहे. केंद्रातर्फे शेतकऱ्यांना जैविक शेतीचे प्रशिक्षण दिले जाते. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून, गायी दिल्या जातात. गायीपासून केंद्राने विविध वस्तूंची निर्मिती केली आहे. या वस्तूंच्या निर्मितीचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना दिल्या जाते. या प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र केंद्र देते. या प्रमाणपत्राद्वारे शेतकऱ्यांना शेतीसंदर्भात कुठलाही व्यवसाय उभारायचा असेल तर ३५ टक्के सबसिडी मिळते. ज्या गाई दूध देत नाही, अशा गाई शेतकऱ्यांकडून घेऊन केंद्र त्याचे संगोपन करते. कत्तलखान्याकडे जाणाऱ्या गाईचे संरक्षण करते. दरवर्षी जवळपास ५ हजारावर शेतकऱ्यांना केंद्रातर्फे प्रशिक्षण दिले जाते.
येथे गोमूत्र, गोमय, गाईचं दूध, दही व तूप या पंचगव्यापासून अनेक औषधे तयार करून अनेक व्याधींवर उपाय शोधण्यात यशस्वी झाले आहे.
पंचगव्यापासून तयार करण्यात आलेल्या औषधांवर नीरीमध्ये संशोधन झाले आहे. विविध त्वचारोग, रक्तदाब, मधुमेह, अस्थमा, पोटाचे विकार व श्वसनासंबंधी रोग, संधिवात व किडनी आदी विकारांवरही प्रभावी औषधे निर्माण होत असून अनेक रुग्णांना त्याचा फायदा झाला आहे.
याशिवाय, स्वाईन फ्लू, डेंग्यू आदी व्याधींवर औषध निर्मिती करण्यात आली आहे. ज्या व्याधी आधुनिक चिकित्सेने बऱ्या होऊ शकत नाहीत, अशा व्याधी पंचगव्य चिकित्सेने पूर्णपणे बऱ्या झाल्याचा अनुभव अनेकांना आला आहे. येथील औषधांची उपयुक्ततता अपेक्षेबाहेर सिद्ध झाली असून किडनी विकाराच्या रुग्णांना ह्यडायलिसीसह्ण बंद करणे शक्य झाले आहे.
कित्येक रुग्णांचा एक्झिमा पूर्णपणे बरा झालेला आहे. त्याचप्रमाणे ल्युकोडर्मा, पाईल्स इ. रोगांवरही पंचगव्यातून औषध निर्माण केले जात असून त्याची देशभर विक्री केली जात आहे. गो-विज्ञान अनुसंधान केंद्राद्वारे निर्मित एकूण ४० औषधांना एफ.डी.ए. कडून परवाना प्राप्त झाला आहे तर ५ औषधांना अमेरिका व चायनाने पेटेंट दिले आहे.२२२