शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील पिकविम्याच्या लाभापासून शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 23:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान पिक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात ४५ हजार शेतकऱ्यांनी विमा करवून घेतला. नुकसान भरपाई देण्याची वेळ आली, तेव्हा कृषी विभाग नियमांवर बोट ठेवून, शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवत आहे.अवकाळीपासून, गारपीट, दुष्काळ, कीड, रोग यापासून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी सरकारने पंतप्रधान पिक विमा योजना राबविली. पिक विमा काढताना शासन ...

ठळक मुद्देविमा कंपनी आणि कृषी विभागाकडून शेतकऱ्यांची फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान पिक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात ४५ हजार शेतकऱ्यांनी विमा करवून घेतला. नुकसान भरपाई देण्याची वेळ आली, तेव्हा कृषी विभाग नियमांवर बोट ठेवून, शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवत आहे.अवकाळीपासून, गारपीट, दुष्काळ, कीड, रोग यापासून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी सरकारने पंतप्रधान पिक विमा योजना राबविली. पिक विमा काढताना शासन निर्णय १७ नोव्हेंबर २०१७ नुसार ज्या नियम आणि अटी ठेवण्यात आल्या होता. त्या नियम अटीकडे नुकसान भरपाई देताना शासनाने दूर्लक्ष केले. शेतकऱ्यांना नुकसान भरपायी देण्यासाठी कृषी विभागाकडून वेगळाच शासन आदेश दाखविण्यात येत आहे. या नव्या आदेशामुळे शेतकरी लाभापासून वंचित राहणार असून, त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.यावर्षी झालेला अपुरा पाऊस आणि पिकांवर आलेल्या रोगामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकºयांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना पिक विमा काढण्यास सांगितले होते. त्यासाठी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसिद्धीही करण्यात आली. विमा योजनेची प्रसिद्धी करताना, शासन निर्णयानुसार दुष्काळ, कीड, भूस्खलन, पूर, चक्रीवादळ, पाण्याअभावी नुकसान झाल्यास विमा रक्कम मिळणार असल्याचे कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. ४५ हजार शेतकऱ्यांनी विम्याचा हप्ता भरला. यातून कोट्यावधी रुपये विमा कंपनीकडे जमा झाले. परंतु पिकांवर आलेली कीड आणि अपुऱ्या पावसामुळे यावर्षी पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी विम्याच्या रकमेसाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे अर्ज केले. नियमानुसार मदतीसाठी कृषी, महसूल आणि विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करणे आवश्यक होते. मात्र सर्वेक्षणच झाले नाही. यासंदर्भात डीपीसीच्या बैठकीत जि.प. सदस्य शिवकुमार यादव यांनी हा मुद्दा पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक मिलिंद शेंडे यांनी नियमावर बोट ठेवत विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळणार नसल्याचे सांगितले. यासाठी शासनाच्या आदेशाचे कारण पुढे करण्यात आले. अधिकाऱ्यांकडून विमा कंपन्यांची पाठराखण का?शासनाचा जीआरमध्ये स्पष्ट उल्लेख असतानाही, कृषी अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. कृषी अधिकाऱ्यांची ही भूमिका शेतकऱ्यांचे नुकसान व विमा कंपन्याना लाभ मिळवून देणारी आहे. अधिकाऱ्यांकडून विमा कंपन्यांची पाठराखण करण्यामागचे कारण संशय निर्माण करणारे आहे.शिवकुमार यादव, सदस्य, जि.प.

टॅग्स :Farmerशेतकरीnagpurनागपूर