शेतकरी अडले, मंत्री धावले
By Admin | Updated: December 19, 2014 00:43 IST2014-12-19T00:43:07+5:302014-12-19T00:43:07+5:30
हिवाळी अधिवेशनाच्या दहाव्या दिवशी गुरुवारी विधानभवनावर आठ मोर्चे धडकले. यात शेतकऱ्यांचा प्रश्न लावून धरणारे दोन मोर्चे होते. रामटेक तालुक्यातील शेतकऱ्यांनी सिंचनाची सोय करून देण्याची मागणी

शेतकरी अडले, मंत्री धावले
नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या दहाव्या दिवशी गुरुवारी विधानभवनावर आठ मोर्चे धडकले. यात शेतकऱ्यांचा प्रश्न लावून धरणारे दोन मोर्चे होते. रामटेक तालुक्यातील शेतकऱ्यांनी सिंचनाची सोय करून देण्याची मागणी लावून धरीत जलसंपदा व जलसंधारणमंत्री विजय शिवतारे यांना मोर्चात येण्यास भाग पाडले. यावेळी दाणे न भरलेल्या लोंब्या त्यांना भेट म्हणून देण्याचा प्रयत्न झाला. या मोर्चासोबतच वनमजूर, भूमिहीन, माजी सैनिक, केरोसीन हॉकर्स, मातंग समाज, अपंग निराधार मोर्चेकऱ्यांनी आपला आवाज बुलंद केला. आजच्या सर्वच मोर्चांनी सरकारचे लक्ष वेधले.