शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कर्जमाफी! 'वचन मोडलं तर आम्ही कसे वागतो हे जनतेला माहितीय' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 14:02 IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सभागृहात झालेल्या गोंधळावरुन भाजपाला लक्ष्य केलं.

नागपूर - शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मी स्वत: अनेकवेळा रस्त्यावर उतरलो आहे. वचन मोडलं तर आम्ही कसे वागतो, हे लोकांना कळलंय. जनतेला याची खात्री पटलीय, त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना दिलेली आश्वासन पाळणार हेही त्यांना कळलंय, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला. तसेच, भाजपा नेत्यांनी आम्हाला वचन पाळण्याचं शिकवू नये, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सभागृहात झालेल्या गोंधळावरुन भाजपाला लक्ष्य केलं. विरोधकांनी सभागृहात समस्या मांडायच्या असतात, पण हा गोंधळ बरा नव्हे. केंद्राकडून राज्याला येणारा 15 हजार कोटींची परतावा मिळण्यास सुरुवात झाली आहे. साधारण 4 ते 4.5 हजार कोटी रुपयांचा पहिला हफ्ता राज्याला मिळाल्याची नुकतीच माहिती मला मिळालीय. तसेच, भाजपा नेते आणि विरोधक जी घोषणाबाजी सभागृहात करतायेत, ती केंद्रातल्या सरकारकडे करायला पाहिजे होती. जे लोकं सामना वाचत नाही म्हणत होती, तीच लोकं आज सामना वर्तमानपत्राचे पोस्टर्स घेऊन सभागृहात आली होती. त्यामुळे सामना वाचत नाही, हे केवळ ते दाखवत होते, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या वाक्याची आठवण करुन दिली. फडणवीसांनी आधीच सामना वाचला असता तर आज आमचा आणि त्यांचा सामना झाला नसता. फडणवीस सामना वाचत नाही, असे सांगत होते. मात्र, आज त्यांच्या हातात सामना दिसला. त्यामुळे आम्ही सामनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जनतेचे विषय मांडत होतो, हे त्यांनी कबूल केले, असेही ठाकरेंनी म्हटले. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बांधिल असून जयंत पाटील यांनी मदतीची आकडेवारी दिलीय. त्यानुसार, शेतकऱ्यांना मदत पुरविण्यत येत असल्याचेही उद्धव ठाकरेंनी सांगितले.

दरम्यान, नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन सुरू असलेल्या वादावरही उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं. जालियनावाला बाग हत्याकांडाची आठवण झाल्याचं सांगत, मोदी सरकारवर टीकाही केली. तसेच, केवळ उत्तर नसल्याने प्रश्न निर्माण केल्या जात आहेत. जनतेला चिंतेत ठेवायचं, अस्वास्थ्य ठेवायचं, छोटाशा कारणावरुन ठिणग्या टाकण्याचे काम केलं जात आहे, असेही त्यांनी म्हटले. तसेच, हिंदुत्ववाच्या मुद्द्यावर कसं उत्तर द्ययाचं हे मला चांगला ठाऊक आहे, ते मला शिकवण्याची गरज नाही, असे म्हणत सावरकरांच्या आणि हिदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेना व मुख्यमंत्र्यांना टार्गेट करणाऱ्या भाजपा नेत्यांना उद्धव ठाकरेंनी टोला लगावला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसfarmer suicideशेतकरी आत्महत्या