वाहनाच्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:42 IST2021-02-05T04:42:09+5:302021-02-05T04:42:09+5:30
बुटीबाेरी : भरधाव अज्ञात वाहनाने माेटरसायकलला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीचालक शेतकऱ्याचा उपचाराला नेताना वाटेत मृत्यू ...

वाहनाच्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू
बुटीबाेरी : भरधाव अज्ञात वाहनाने माेटरसायकलला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीचालक शेतकऱ्याचा उपचाराला नेताना वाटेत मृत्यू झाला. ही घटना बुटीबाेरी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावर नुकतीच घडली.
युवराज माणिकराव चाैधरी (५७, रा. गाेदावरी नगर, बुटीबाेरी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ते रविवारी (दि. २४) सायंकाळी त्यांच्या खापरी शिवारातील शेतातून एमएच ४०-व्ही ३८८९ क्रमांकाच्या माेटरसायकलने घराकडे येत हाेते. दरम्यान, भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या माेटरसायकलला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्यांना बुटीबाेरी येथे आणले. तिथे प्रथमाेपचार केल्यानंतर नागपूर येथील खासगी हाॅस्पिटलमध्ये हलविण्यात आले. हाॅस्पिटलमध्ये पाेहाेचताच डाॅक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घाेषित केले. याप्रकरणी बुटीबाेरी पाेलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भादंवि २७९, ३३८, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक चाैधरी करीत आहेत.