शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
2
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
3
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
4
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
5
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
6
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
7
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
8
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
9
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
10
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
11
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
14
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
15
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
16
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
17
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
18
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
19
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
20
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
Daily Top 2Weekly Top 5

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 17:11 IST

Nagpur : सायसर येथील घटना; विहिरीत उडी घेऊन संपविले जीवन

लोकमत न्यूज नेटवर्क पिपरा (बेला): थकीत कर्जाचे हप्ते भरणे कठीण जात असल्याने कंटाळलेल्या शेतकऱ्याने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना बेला पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिपरालगतच्या सायसर शिवारात बुधवारी (दि. १) दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.

प्रशांत बाबाराव आगलावे (३८, रा. सायसर, ता. उमरेड) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. प्रशांतकडे चार एकर सामाईक शेती आहे. पिपरा व बेला येथील बँकेतून तसेच बजाज फायनान्सकडून कर्ज घेतले होते. शिवाय, मित्र व नातेवाइकाकडूनही उसने पैसे घेतले होते. त्याला या कर्जाच्या हप्त्यापोटी दर महिन्याला १८ हजार रुपये बँकांना द्यावे लागायचे. आर्थिक परिस्थिती पडल्याने बँकांचे हप्ते भरणे शक्य होत नसल्याने तो मागील काही दिवसांपासून चिंतित होता. त्यातच त्याने बुधवारी सायसर शिवारातील मिलिंद दामोदर आयचित, रा. नागपूर यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. कैलास वंजारी शेतात गेले असता ही बाब त्यांच्या निदर्शनात आली. त्यामुळे त्यांनी लगेच पोलिस पाटील राजू कावळे यांच्या माध्यमातून पोलिसांना कळविली. ठाणेदार अजित कदम यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि मृतदेह विहिरीतून बाहेर काढत उमरेड शहरातील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी बेला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. मृताच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

दुचाकीसह साहित्य विहिरीच्या काठावरप्रशांतने आत्महत्या करण्यापूर्वी त्याची मोटरसायकल, शर्ट, मोबाइल फोन व चपला विहिरीच्या काठावर ठेवल्या होत्या. शर्टच्या खिशात २०० रुपये आणि चिठ्ठी आढळून आली. चिठ्ठीत कर्जाच्या हप्त्याचा उल्लेख असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्या पश्चात पत्नी व तीन मुले आहेत.

 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र