शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

प्रसिद्ध साहित्यिक अनिल नितनवरे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 20:05 IST

मराठीचे गाढे अभ्यासक, साहित्यिक, कवी, प्रयोगशील एकांकिकाकार तथा समीक्षक प्रा.अनिल नितनवरे (५३) यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुपारी १ वाजताच्या सुमारास निधन झाले.

ठळक मुद्देवर्गातच आला हृदयविकाराचा झटका मराठीचा अभ्यासक हरविलासाहित्यवर्तुळात शोककळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मराठीचे गाढे अभ्यासक, साहित्यिक, कवी, प्रयोगशील एकांकिकाकार तथा समीक्षक  डॉ. अनिल नितनवरे (५३) यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुपारी १ वाजताच्या सुमारास निधन झाले. साकोली येथील मनोहरभाई पटेल महाविद्यालयात ते मराठीचे विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते. ज्या मराठी भाषेसाठी त्यांनी स्वत:ला समर्पित केले होते, त्याचेच अध्यापन कार्य करत वर्गखोलीतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या अचानक निघून जाणे साहित्याप्रमाणे सामाजिक वर्तुळालादेखील चटका लावून गेले आहे.प्रा. नितनवरे हे दैनंदिनीप्रमाणे मंगळवारी महाविद्यालयात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी ते वर्गात गेले. काही वेळातच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. त्यांच्यामागे आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी , तीन बहिणी, भाऊ आहेत. त्यांच्या पार्थिवावर बुधवारला दुपारी १२ वाजता नागपूर येथे जयताळा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील.मूळचे नागपूर जिल्ह्यातील असलेले नितनवरे सुरुवातीपासूनच मराठीसाठी समर्पित होते. १९८५ साली माध्यमिक शालांत परीक्षेत कला शाखेतून ते गुणवत्ता यादीत आले होते व मराठी विषयात तर ते विदर्भातून प्रथम होते. त्यांनी १९९० मध्ये नागपूर विद्यापीठातून एम.ए. मराठीची पदवी घेतली. त्यावेळी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यानिमित्त त्यांना कै. ना.के. बेहेरे सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले होते. १९८९ पासून ते ‘समुचित’ या त्रैमासिकाचे सहसंपादक होते.महाराष्ट्रातील दर्जेदार नियतकालिकात त्यांचे ललित, वैचारिक आणि समीक्षापर लेखन प्रकाशित झाले. अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संसद कवितानिल चळवळ यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. १९९१ पासून ते मराठी विषयाचे अध्यापन करीत होते. धम्मराष्ट्राची घटना हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. नामांतर आंदोलन, कळा अभंगाची, आंबेडकरवादी विचारकविता, नामांतर : स्वप्न आणि सत्य ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. विविध नियतकालिकांमधून त्यांची कविता, समीक्षा, लेख प्रकाशित होत. विविध समकालीन साहित्यिक व सांस्कृतिक चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. हळवे व्यक्तिमत्त्व असलेले नितनवरे हे विद्यार्थ्यांमध्येदेखील लोकप्रिय होते.

टॅग्स :literatureसाहित्यDeathमृत्यू