पीडित मुलीच्या कुटुंबीयांचा लागला शोध
By Admin | Updated: September 3, 2016 00:55 IST2016-09-03T00:55:21+5:302016-09-03T00:55:21+5:30
वैज्ञानिक वडिलांच्या शोषणाला बळी पडलेल्या मुलींना आता महिला बाल सुधारगृहात जीवन जगावे लागणार आहे.

पीडित मुलीच्या कुटुंबीयांचा लागला शोध
लैंगिक अत्याचार प्रकरण : सेवानिवृत्त वैज्ञानिकाच्या पोलीस कोठडीत वाढ
नागपूर : वैज्ञानिक वडिलांच्या शोषणाला बळी पडलेल्या मुलींना आता महिला बाल सुधारगृहात जीवन जगावे लागणार आहे. दुसरीकडे १६ वर्षीय पीडित अल्पवयीन कुटुंबीयांचा शोध लागला आहे. ते अमरावती येथील रहिवासी आहेत. ते मिळाल्यानंतरच खरा प्रकार उघडकीस येईल. यादरम्यान न्यायालयाने शुक्रवारी डॉ. मकसूद अंसारीची पोलीस कोठडी ७ सप्टेंबरपर्यंत वाढविली आहे. धंतोली पोलिसांनी डॉ. अंसारीला ३१ आॅगस्ट रोजी अटक केली होती. १६ वर्षीय मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आली होता. डॉ. अंसारी मागील आठ वर्षांपासून तिचे शोषण करीत होता. अकरा आणि आठ वर्षाच्या मुलींसोबतही तो लैंगिक शोषणाचा प्रयत्न करायचा. मोठ्या मुलीने आपल्या मैत्रिणीला आपबिती सांगितली. मैत्रिणीने तिच्या आईला सर्व प्रकार सांगितला. तिच्या आईने पोलिसांना सूचना दिली. त्यातून हा प्रकार उघडकीस आला.
डॉ. अंसारीने तिन्ही मुलींना लहानपणीच दत्तक घेतले होते. यात त्याच्या तत्कालीन पत्नीनेही मदत केली होती. दत्तक घेण्यासाठी आवश्यक कायदेशीर बाबीसुद्धा पूर्ण करण्यात आल्या नव्हत्या. तेव्हापासून या तिन्ही मुली त्याच्यासोबतच राहत होत्या.
डॉ. अंसारी २००० साली सेवानिवृत्त झाले. ते मूळचे उत्तर प्रदेशातील बलरामपूर येथील निवासी आहेत. नोकरीत लागल्यापासून ते येथेच स्थायिक झाले. त्यांनी तीन लग्न केले. तिन्ही पत्नींसोबत त्यांचा घटस्फोट झाला. ते मुलींसोबत भाड्याने राहत होते. त्यांच्या कुटुंबातील कुणीच त्यांच्यासोबत नाही. त्यामुळे पोलिसांनी तिन्ही मुलींना महिला बाल सुधारगृहात ठेवले आहे. तिन्ही मुली शहरातील एका पब्लिक स्कूलमध्ये शिकतात. या घटनेपासून त्यांचे शिक्षणही प्रभावित झाले आहे. पोलिसांनी पीडित व डॉ. अंसारी यांची वैद्यकीय तपासणी केली आहे. सुरुवातीला डॉ. अंसारी मुलींबाबत काहीही सांगण्यास टाळाटाळ करीत होता.(प्रतिनिधी)
वयोवृद्ध असल्याने पोलीस बळाचा वापर करण्यास मागे पुढे पाहत आहे. पोलिसांनी तपासाची दिशा बदलवित मोठ्या मुलीच्या कुटुंबीयांचा शोध लावला आहे. डॉ. अंसारी यांना चांगला पगार होता. त्याला ५२ हजार रुपये पेन्शन मिळते. निरीक्षक राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पीएसआय वाघ या प्रकरणाचा तपास करीत आहेत.