शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

कौटुंबिक कलह वाढताहेत, नागपुरात वर्षाला सव्वातीन हजार तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 14:23 IST

जगामध्ये भारतीय विवाह संस्था सर्वात बळकट मानली जाते, पण येणारा काळ ही ओळख पुसून टाकेल, अशी परिस्थिती तयार होत आहे. कुटुंब न्यायालयात दरवर्षी दाखल होणाऱ्या प्रकरणांची आकडेवारी भारतीय विवाह संस्थेचे आरोग्य बिघडल्याचे स्पष्ट करीत आहे. एकट्या नागपूर कुटुंब न्यायालयाचे उदाहरण घेतल्यास, येथे दरवर्षी कौटुंबिक कलहाच्या सरासरी सव्वातीन हजारावर तक्रारी (प्रकरणे) दाखल होत आहेत.

ठळक मुद्देविवाह संस्थेचे आरोग्य बिघडलेदाम्पत्यांमधील हेवेदावे कारणीभूतदहा वर्षात ३३ हजार ५६६ प्रकरणे दाखल

राकेश घानोडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जगामध्ये भारतीय विवाह संस्था सर्वात बळकट मानली जाते, पण येणारा काळ ही ओळख पुसून टाकेल, अशी परिस्थिती तयार होत आहे. कुटुंब न्यायालयात दरवर्षी दाखल होणाऱ्या प्रकरणांची आकडेवारी भारतीय विवाह संस्थेचे आरोग्य बिघडल्याचे स्पष्ट करीत आहे. एकट्या नागपूर कुटुंब न्यायालयाचे उदाहरण घेतल्यास, येथे दरवर्षी कौटुंबिक कलहाच्या सरासरी सव्वातीन हजारावर तक्रारी (प्रकरणे) दाखल होत आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर कुटुंब न्यायालयात २००८ ते २०१७ या १० वर्षांत एकूण ३३ हजार ५६६ (दरवर्षी सरासरी ३,३५६) प्रकरणे दाखल झाली होती. यावर्षी मार्चपर्यंत १०५२ प्रकरणे दाखल झाली. ती संख्या आता निश्चितच वाढली आहे. त्यावरून विवाह संस्थेला तडे जात असल्याचे सिद्ध होते.ही आहेत कारणेयामागे विविध कारणे असून त्यासंदर्भात नागपूर कुटुंब न्यायालय विधिज्ञ संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. श्याम अंभोरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी वकिली व्यवसायातील अनुभवावरून अत्यंत महत्त्वाची माहिती दिली. स्वत:बद्दचा अहंकार, एकमेकांना कमी लेखणे, जोडीदाराने आपल्या मनासारखे वागावे असा आग्रह धरणे, एकमेकांच्या कामात हस्तक्षेप, सहनशीलतेचा अभाव, विभक्त कुटुंब पद्धती, एकमेकांना पुरेसा वेळ देण्यास टाळाटाळ, विवाहबाह्य संबंध, शारीरिक व मानसिक छळ, एकमेकांच्या नातेवाईकांचा अनादर करणे इत्यादी अनेक कारणांमुळे विवाह संस्थेला तडे जात असल्याचे त्यांनी सांगितले.भांडणामुळे एका छताखाली राहणे अशक्य झाल्यानंतर पती-पत्नी, घटस्फोट, पोटगी, अपत्यांचा ताबा, राहायला घर मिळणे, स्त्रीधन परत मिळणे, मालमत्ता विक्रीवर मनाईहुकूम मिळविणे यासह अन्य विविध वैवाहिक अधिकार मिळविण्यासाठी कुटुंब न्यायालयात धाव घेतात.पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धतीमुळे पती-पत्नीमधील वाद, संबंध कायमचे तोडण्यापर्यंतच्या विकोपाला जात नव्हता. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळी मध्यस्थी करून भांडणाऱ्या  पती-पत्नीमध्ये मेळ घडवून आणत होते. आज तशी परिस्थिती नाही. त्यामुळे पती-पत्नी एकमेकांना समजून घेण्यात कमी पडल्यास त्याचा थेट परिणाम विवाहावर होतो व त्यांचे वैवाहिक संबंध कायमचे संपुष्टात येतात, असे मत त्यांनी व्यक्त केले.

वर्ष    प्रकरण संख्या२००८    २५२४२००९    ३६२९२०१०    २५६०२०११    २६७४२०१२    ३३००२०१३    ३६८२२०१४    ३८८१२०१५    ३६५५२०१६    ३७९८२०१७    ३८६३ 
  
  

 

टॅग्स :FamilyपरिवारCourtन्यायालय