सोयाबीन तेलात घसरण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:11 IST2021-01-16T04:11:54+5:302021-01-16T04:11:54+5:30
नागपूर : केंद्रीय अर्थसंकल्पात खाद्यतेलावरील आयात शुल्कात १० टक्के कपात होण्याच्या शक्यतेने नागपुरात शुक्रवारी ठोक बाजारात सोयाबीन तेलाच्या दरात ...

सोयाबीन तेलात घसरण!
नागपूर : केंद्रीय अर्थसंकल्पात खाद्यतेलावरील आयात शुल्कात १० टक्के कपात होण्याच्या शक्यतेने नागपुरात शुक्रवारी ठोक बाजारात सोयाबीन तेलाच्या दरात डब्यामागे (१५ किलो) ५० रुपयांची घसरण होऊन भाव १८८० ते १९०० रुपयांवर स्थिरावले. शनिवारी भावात पुन्हा घसरण होण्याची शक्यता तेल व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. किरकोळमध्ये सोयाबीन तेल १३० रुपये किलो विकल्या जात आहे.
सध्या क्रूड सोयाबीन तेलावर आयात शुल्क ३५ टक्के तर रिफाइंड सोयाबीन तेलावर ४५ टक्के आहे. त्यामुळे आयात महाग झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून देशांतर्गत स्थानिक बाजारात सोयाबीन तेलाचे दर वाढले. त्याचा स्थानिक साठेबाजांनीही फायदा घेतला. पण केंद्रीय स्तरावर सोयाबीनचे आयात शुल्क कमी होण्याचे संकेत मिळतात दुपारपासूनच सोयाबीन तेलाच्या भावात घसरण सुरू झाली. दिवाळीपूर्वी १०० रुपये किलोवर असलेले सोयाबीन तेल दिवाळीनंतर ११४ रुपयांवर आणि डिसेंबरमध्ये तब्बल १३० रुपयांवर पोहोचले आहे. दोन महिन्यात डब्यामागे ४०० रुपयांची वाढ झाली. दिवाळीनंतर मागणी कमी असतानाही साठेबाजांनी संगनमत करून सोयाबीन तेलाचे दर वाढविले. आता आयात शुल्क कमी होण्याचे संकेत मिळताच एकाच दिवस ५० रुपयांनी घसरण झाली. शनिवारी पुन्हा १०० रुपयांची घसरण होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली.