नाल्यात पडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:25 IST2021-02-20T04:25:34+5:302021-02-20T04:25:34+5:30

नागपूर : पाय घसरून नाल्यात पडल्याने एका तरुणाचा करुण अंत झाला. धनराज श्रीवास (वय २८) असे त्याचे नाव असून ...

Falling into the nala and dying | नाल्यात पडून मृत्यू

नाल्यात पडून मृत्यू

नागपूर : पाय घसरून नाल्यात पडल्याने एका तरुणाचा करुण अंत झाला. धनराज श्रीवास (वय २८) असे त्याचे नाव असून तो कळमन्यातील मिनी माता नगरात राहत होता.

शुक्रवारी दुपारी १२.३० च्या सुमारास धनराज लकडगंजमधील हल्दीराम फॅक्टरीमागच्या नाल्यातून जात होता. त्याचा पाय घसरल्याने तो पडला आणि नाल्यात बुडून मरण पावला. मिळालेल्या माहितीवरून लकडगंज पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

----

कुख्यात मक्का कांबळे जेरबंद

नागपूर : दोन वर्षांसाठी नागपुरातून हद्दपार करण्यात आलेला कुख्यात गुंड संदीप ऊर्फ मक्का प्रदीप कांबळे (वय २८) याच्या बेलतरोडी पोलिसांनी शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास मुसक्या आवळल्या. त्याला १६ ऑक्टोबर २०१९ ला दोन वर्षांकरिता नागपुरातून हद्दपार करण्यात आले होते. हद्दपारीची मुदत संपायची असताना तो खापरीतील एका हॉटेलजवळ बेलतरोडी पोलिसांना शुक्रवारी सकाळी दिसला. पोलीस आपल्याकडे येत असल्याचे पाहून तो त्याच्या दुचाकीने पळू लागला. मात्र, पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. झडतीत त्याच्याकडे एक चाकू आढळला. तो जप्त करून पोलिसांनी त्याला कोठडीत डांबले.

----

Web Title: Falling into the nala and dying