शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बोगस शिक्षक, बनावट ID आणि कोट्यवधींचा घोटाळा : घोटाळेबाज धोटे मात्र हॉस्पिटलमध्ये सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 20:06 IST

शालार्थ घोटाळा : अटक होताच धोटेंची 'शुगर' वाढली, चौकशी मात्र स्थगित!

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यातील अटकेतील आरोपी व मोहपा येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व भाजपाचे धापेवाड्याचे माजी पंचायत समिती सदस्य दिलीप भास्करराव धोटेंची अद्यापही चौकशी झालेली नाही. अटक होताच शुगरचा त्रास असल्याचे कारण दिल्याने धोटेंची रवानगी मेयो इस्पितळात झाली होती. मात्र अद्यापही धोटेंचा तेथेच मुक्काम असून ही 'राजकीय शुगर' आहे की काय, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

धोटे अध्यक्ष असलेल्या संस्थेच्या कळमेश्वर तालुक्यात प्रतिभा उच्च प्राथमिक शाळा (मोहपा) व धापेवाडा पब्लिक स्कूल अशा दोन शाळा आहेत. शनिवारी सायबर पोलिसांनी दिलीप धोटे यांना ५ शिक्षकांचा बोगस आयडी तयार केल्याप्रकरणी अटक केली होती. धोटेंनी काही वर्षांपूर्वी शाळेत ८ शिक्षकांची बोगस कागदपत्रांच्या आधारे नियुक्ती करून अधिकाऱ्यांच्या मदतीने त्यांचे शालार्थ आयडी तयार केले. यातील ५ शिक्षकांचा १० वर्षाचा अरियर्स काढण्यासाठी म्हणजे प्रत्येक शिक्षकांचे १३ ते १४ लाख रुपये काढून देण्यासाठीही त्यांनी शिक्षकांकडून पैसे वसूल केले. यात लाखो रुपयांचा गैरव्यवहार त्यांनी केल्याची माहिती आहे. दिलीप धोटेंना अटक केल्यानंतर सायबर पोलिसांनी त्यांना सत्र न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. मात्र धोटे तेव्हापासून मेयो रुग्णालयातच उपचार घेत आहेत. त्यामुळे पोलिसांसमोर प्रतीक्षा करण्याशिवाय काहीच पर्याय नाही.

चौकशी न करण्याबाबत राजकीय दबावधोटेंना अटक झाल्यानंतर शनिवारी जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. शालार्थ आयडी घोटाळ्यात बोगस नियुक्त्या करून कोट्यवधींची माया जमवणाऱ्या संस्था चालकांना घाम फुटला आहे. धोटेंना अटक होऊ नये, यासाठी मोठ्या राजकीय नेत्याने प्रयत्न केले होते. आता सखोल चौकशी कशी टाळता येईल, यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

शालार्थ घोटाळ्यात चरण चेटुले यांना जामीन मंजूर

  • राज्यात गाजत असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये आरोपी असलेले भंडारातील राजश्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चरण नारायण चेटुले यांना गुरुवारी जामीन मंजूर करण्यात आला. सत्र न्यायाधीश ए. ए. जोगळेकर यांनी हा निर्णय दिला. चेटुले यांना अटक करताना नियमांचे पालन झाले नाही, असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले.
  • घोटाळ्यातील आरोपींविरुद्ध २ सदर पोलिसांनी ११ एप्रिल २०२५ रोजी एफआयआर दाखल केला आहे. राज्य सरकारने घोटाळ्याची सखोल चौकशी करण्यासाठी गेल्या एप्रिलमध्ये एसआयटी स्थापन केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी आर्थिक लाभाकरिता ५०० पेक्षा जास्त शिक्षकांची पात्रता नसताना अवैधपणे नियुक्ती केली आहे. चेटुलेतर्फे अॅड. दीपेन जग्यासी यांनी बाजू मांडली.
टॅग्स :nagpurनागपूरEducationशिक्षणfraudधोकेबाजी