शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भरतीच्या बनावट मॅसेजने शेकडो तरुणांना फसविले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 00:09 IST

भरतीचा बनावट मॅसेज वाचून राज्यातील विविध जिल्ह्यातून बुधवारी नागपूरला आलेल्या तरुणांना आपली फसवणूक झाल्याचे समजले. एरिया रिक्रूटमेंट ऑफीस(एआरओ)कडून कोणत्याही भरतीची प्रक्रिया नसल्याची माहिती मिळाल्यानंतर उमेदवार निराश झाले.

ठळक मुद्देराज्यभरातून आले उमेदवार : अखेर पोलिसांना काढावी लागली समजूत

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : भरतीचा बनावट मॅसेज वाचून राज्यातील विविध जिल्ह्यातून बुधवारी नागपूरला आलेल्या तरुणांना आपली फसवणूक झाल्याचे समजले. एरिया रिक्रूटमेंट ऑफीस(एआरओ)कडून कोणत्याही भरतीची प्रक्रिया नसल्याची माहिती मिळाल्यानंतर उमेदवार निराश झाले. त्यामुळे व्हॉटस्अप मॅसेज आल्यानंतर त्याची खातरजमा केली असती तर आपली फसवणूक झाली नसती, असे उमेदवारांना वाटले.सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नांदेड, पुणे, जळगाव, भुसावळ आदी ठिकाणचे तरुण दुपारी २ पासून नागपुरात पोहोचणे सुरू झाले. विदर्भातूनही उमेदवार दाखल झाले. त्यामुळे एआरओ कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर गर्दी झाली. तरुणांंना आतमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली नाही. प्रवेशद्वारावर जवान तरुणांंना भरती नसल्याचे सांगून घरी परत जाण्याचा सल्ला देत होते.‘लोकमत’शी बोलताना तरुणांंनी भरती असल्यामुळे अपेक्षेने आल्याचे सांगितले. अनेकजण उसणे पैसे घेऊन आले होते. येथे आल्यानंतर त्यांना फटका बसला. बनावट मॅसेज कुणी पसरविला, याचा तरुण शोध घेत आहेत. याबाबत पोलिसात तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तरुणांची संख्या अधिक असल्यामुळे पोलीस तेथे पोहोचले. पोलिसांनी तरुणांंची समजूत घातली. यानंतर पुन्हा असा मॅसेज आल्यास खातरजमा करण्याचा सल्ला पोलिसांनी दिला.नागपुरात नाही ‘टीए’विशेष म्हणजे टेरिटोरियल आर्मी (टीए) म्हणजे प्रादेशिक सेनेचे कार्यालय नागपुरातून स्थानांतरित करण्यात आले आहे. त्यामुळे या कार्यालयाच्या वतीने नागपुरात भरती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. भरतीच्या वेळी सेनेकडून अधिकृतरीत्या माहिती देण्यात येते. त्यामुळे हा मॅसेज बनावट असल्याचे सिद्ध झाले.राहणार कुठे ?भरती नसल्याचे समजल्यानंतर तरुणांना रात्र कुठे काढावी, असा प्रश्न पडला. गोंदिया, भंडारा, नागपूरच्या आजूबाजूच्या परिसरातील युवक परत गेले. परंतु गडचिरोलीसह राज्यातील इतर भागातून आलेल्या तरुणांंना राहण्याचा प्रश्न पडला. गावाकडे जाण्यासाठी रेल्वे तसेच बसही नव्हती. खासगी वाहनाने जाण्यापुरतेही पैसे त्यांच्याकडे नव्हते.

टॅग्स :Unemploymentबेरोजगारीfraudधोकेबाजी