शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात बनावट हॉलमार्कचे  दागिने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 00:08 IST

भारतीय मानक ब्युरोच्या (बीआयएस) नागपूर विभागाने सूचनेच्या आधारावर कारवाई करून बनावट हॉलमार्क दागिने जप्त केले आणि संचालकाला नोटीस जारी करण्यात आला. विभागाने विशेष मोहिमेंतर्गत गोंदिया येथील विविध ज्वेलरी शोरुमची तपासणी केली. त्यात दुर्गा येथील शोरुममध्ये बनावट हॉलमार्कचे दागिने आढळून आले.

ठळक मुद्देबीएसआयची कारवाई : पाच लाखांपर्यंत दंडाची तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय मानक ब्युरोच्या (बीआयएस) नागपूर विभागाने सूचनेच्या आधारावर कारवाई करून बनावट हॉलमार्क दागिने जप्त केले आणि संचालकाला नोटीस जारी करण्यात आला. विभागाने विशेष मोहिमेंतर्गत गोंदिया येथील विविध ज्वेलरी शोरुमची तपासणी केली. त्यात दुर्गा येथील शोरुममध्ये बनावट हॉलमार्कचे दागिने आढळून आले.बीएसआयचे नागपूर विभागीय प्रमुख आर.पी. मिश्रा यांनी सांगितले की, ग्राहकांची फसवणूक करून बनावट हॉलमार्क दागिन्यांची विक्री करणे चुकीचे आहे. या अंतर्गत दागिन्यांच्या शोरुमची तपासणी करण्यात येते. बनावट हॉलमार्क दागिन्यांसह संचालकाकडे विक्रीचा परवाना नव्हता. कारवाईदरम्यान सर्व दागिने जप्त कण्यत आले. ग्राहकांना शुद्ध सोन्याचे आणि हॉलमार्कचे दागिने असल्याचे सांगून तो ग्राहकांकडून जास्त पैसे आकारित होता.मिश्रा म्हणाले, यापूर्वी बीआयएसच्यावतीने नागपुरातही काही ज्वेलर्सवर अशीच कारवाई करून बनावट हॉलमार्कचे दागिने जप्त केले होते. नागपुरात जवळपास चार हजार सराफांची दुकाने आहेत. पण बीएसआचा परवाना घेणाऱ्यांची संख्या केवळ १५० च्या आसपास आहे. विभागाच्या अधिकाºयांनी सराफांना बीएसआयचा परवाना घेण्याची विनंती केली आहे. शिवाय विभागाने या संदर्भात जागरुकता कार्यक्रम घेतले आहेत. त्यानंतरही केवळ १०० जणांनी परवाना घेतला. पण सराफा व्यापाºयांच्या संख्येच्या तुलनेत ही संख्या फारच अल्प आहे. परवाना शुल्कही कमी आहे. त्यानंतरही भीतीपोटी व्यापारी पुढे येत नाही. सराफांनी पुढे येऊन परवाना घ्यावा, असे आवाहन मिश्रा यांनी केले. हॉलमार्कचा परवाना घेतल्यास व्यवसायात पारदर्शकता येईल आणि ग्राहकांनाही शुद्ध सोन्याचे दागिने मिळतील, असे ते म्हणाले.भारतीय मानक ब्युरोअंतर्गत एलपीजी सिलिंडर, एलपीजी व्हॉल्व, रेग्युलेअर, विविध दुग्धजन्स पदार्थ, इलेक्ट्रिक केबल, पॅकेजिंग ड्रिकिंग वॉटर, स्टील, सिमेंट आदींसह ११६ उत्पादनांसाठी बीएसआयचा परवाना घेणे बंधनकारक आहे. अशा प्रकरणांमध्ये बीआयएस कायदा-२०१६ मधील तरतूदीनुसार एक ते पाच लाखांपर्यंत दंड अथवा एक वर्ष कारावास होऊ शकतो.

टॅग्स :raidधाडGoldसोनं