शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

खोटे बिल बनविणारे रॅकेट सक्रिय, १,०८३ कोटीचा खोटा व्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 23:56 IST

GST, Fake bill racket active, Nagpur Newsसंपूर्ण महाराष्ट्रात बनावट पावत्या बनवून खोटा व्यवहार करणारे रॅकेट सक्रिय असून त्याचा पर्दापाश जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाच्या (डीजीजीआय) नागपूर झोनल युनिटने केला आहे. खोट्या बिलाद्वारे १,०८३ कोटींचा व्यवहार करून १३५.४० कोटींचे इनपुट टॅक्स क्रेडिट घेतल्याचे अधिकाऱ्यांना तपासणीत आढळून आले.

ठळक मुद्देडीजीजीआय नागपूर झोनल युनिटची कारवाई : १३५.४० कोटीचे घेतले इनपुट टॅक्स क्रेडिट

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : संपूर्ण महाराष्ट्रात बनावट पावत्या बनवून खोटा व्यवहार करणारे रॅकेट सक्रिय असून त्याचा पर्दापाश जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाच्या (डीजीजीआय) नागपूर झोनल युनिटने केला आहे. खोट्या बिलाद्वारे १,०८३ कोटींचा व्यवहार करून १३५.४० कोटींचे इनपुट टॅक्स क्रेडिट घेतल्याचे अधिकाऱ्यांना तपासणीत आढळून आले.बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटची उपलब्धता आणि बनावट पावत्या देण्याबाबतच्या ऑनलाईन डेटा विश्लेषण साधनांद्वारे डीजीजीआय, नागपूर विभाग युनिट, औरंगाबाद प्रादेशिक युनिट आणि नाशिक प्रादेशिक युनिटच्या अधिकाऱ्यांनी शोधमोहीम राबविली. गेल्या आठवड्यात भंडारा ते मालेगावपर्यंत महाराष्ट्रात शेकडो किलोमीटर अंतरावर असलेल्या २२ करदात्यांवर विभागाने धाडी टाकल्या आणि प्रत्येक करदात्याच्या व्यवहाराची तपासणी व चौकशी केली. बºयाच ठिकाणी परिस्थिती प्रतिकूल होती. त्यामुळे अधिकाऱ्यांना स्थानिक पोलिसांची मदत घ्यावी लागली.तपासात असे आढळून आले की, संस्था एकतर अस्तित्वात नव्हती किंवा पत्त्यावर व्यक्तींची घरेही नव्हती. पोर्टलवर व्यावसायिक संस्थांनी पत्त्याचा पुरावा म्हणून अपलोड केलेले भाडे करार आणि वीजबिले बनावट असल्याचे आढळले. वीज बिलावर नमूद केलेले विद्युत मीटर कनेक्शन अस्तित्वात नसल्याचे विद्युत विभागाकडे केलेल्या चौकशीत आढळून आले. तसेच मनपाकडे चौकशी केली असता या संस्थांनी घोषित केलेल्या व्यवसायाचे पत्ते त्यांच्या नोंदीवर उपलब्ध नसल्याचे दिसून आले. या बनावट व्यवहारामध्ये सिल्क यार्न, वुलन यार्न, कॉटन यार्न, पेपर यार्न आणि सिंथेटिक फिलामेंट यार्न आदींचा समावेश आहे.विभागाला मालेगाव येथे असलेल्या या रॅकेटच्या मूळ मालकाला शोधण्यासाठी परिश्रम घ्यावे लागले. त्याने खोट्या बिलाद्वारे १४.७१ कोटींचे इनपुट टॅक्स क्रेडिट घेतले होते. अधिकाऱ्यांनी मालकाला नंदूरबार जिल्ह्याच्या खांडबारा या गावातून १७ तारखेला सायंकाळी ताब्यात घेतले आणि मालेगावला आणले. आरोपीला रविवार, १८ रोजी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात हजर केले. न्यायाधीशांनी त्याला ३१ ऑक्टोबरपर्यंत रिमांड दिला आहे.

टॅग्स :GSTजीएसटीnagpurनागपूरraidधाड