शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मेट्रो रेल्वेमध्ये भरतीसाठी बनावट कंपनीची खोटी जाहिरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 01:16 IST

नामांकित कंपन्यांमध्ये भरतीच्या नावाखाली बेरोजगारांना जाळ्यात ओढून त्यांच्याकडून पैसे वसुलीचा नवीन धंदा नागपुरात सुरू आहे. पोलिसांनी अनेकांवर कारवाई केली असली तरीही दररोज नवीन कंपन्या भरतीची जाहिरात देऊन बेरोजगारांची लूट करीत आहे. या बनावट कंपन्यांच्या जाहिरातीसंदर्भात बेरोजगांनी दक्ष राहावे, असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.

ठळक मुद्दे बेरोजगारांना लुटण्याचा नवीन धंदा : कंपनीचे संचालक फरार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नामांकित कंपन्यांमध्ये भरतीच्या नावाखाली बेरोजगारांना जाळ्यात ओढून त्यांच्याकडून पैसे वसुलीचा नवीन धंदा नागपुरात सुरू आहे. पोलिसांनी अनेकांवर कारवाई केली असली तरीही दररोज नवीन कंपन्या भरतीची जाहिरात देऊन बेरोजगारांची लूट करीत आहे. या बनावट कंपन्यांच्या जाहिरातीसंदर्भात बेरोजगांनी दक्ष राहावे, असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.नागपूर आणि मुंबईत कार्यालय असल्याचे सांगून ए.एन. इंजिनिअरिंग या बनावट कंपनीने नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पात अटेंडंटस्च्या १५० जागा भरण्यात येत असल्याचा मॅसेज मोबाईल क्रमांक आणि नागपुरातील म्हाळगीनगर, हुडकेश्वर रिंगरोड अशा पत्त्यासह व्हॉटस्अ‍ॅपवर टाकला. हा मॅसेज व्हायरल झाला. तरुण-तरुणींनी या पत्त्यावर धाव घेतली तर काहींनी मेट्रो रेल्वेच्या कार्यालयात दूरध्वनी केला. अशी जाहिरात मेट्रो रेल्वे कार्यालयाने दिलेली नसल्याची माहिती पोलिसांना दिली. सदर प्रतिनिधीने कंपनीने जाहीर केलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन केला असता, तो बंद होता. याशिवाय मंगळवारी पोलिसांनी चौकशी केली असता, नमूद पत्त्यावर कंपनीचे कार्यालय नव्हते. कंपनीच्या खोट्या जाहिरातीमुळे किती जणांची फसवणूक झाली, याची माहिती अजूनही पुढे आलेली नाही.मेट्रो रेल्वेमध्ये तिकीट काऊंटर आणि मेन्टेनन्स व हॅण्डलिंग या स्थायी पदासाठी १५० तरुण-तरुणींची भरती करण्यात येत असल्याचे मॅसेज सर्वत्र व्हायरल करण्यात आला. त्याकरिता १८ ते ३५ वयोगटातील १२ वी पास आणि पदवीधरांना (कॉम्प्युटर आॅपरेटर) संधी असल्याचे सांगण्यात आले. प्रशिक्षण कालावधीत तीन महिने १२,५०० रुपये आणि प्रशिक्षणानंतर २५ ते २७ हजार रुपये पगार आणि अर्ज करण्याची अखेरची तारीख २० नोव्हेंबर असल्याचे मॅसेजमध्ये नमूद करण्यात आले होते. याकरिता कंपनीच्या नागपुरातील म्हाळगीनगर चौक, हुडकेश्वर रिंगरोड येथील कार्यालयात अर्जासह संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले होते. भरतीसंदर्भात अनेकांमध्ये चर्चा सुरू झाली. पण मेट्रो रेल्वे कार्यालयाने वेळीच पावले उचलल्यामुळे बेरोजगारांची फसवणूक थांबली. आता बनावट कंपनीचे कार्यालयही नाही आणि मोबाईलही बंद आहे.भरतीसाठी मेट्रो कार्यालयच थेट जाहिरात काढतेमेट्रो रेल्वेत भरतीसाठी मेट्रो रेल्वेने कोणत्याही कंपनीची अधिकृत नियुक्ती केलेली नाही. बनावट कंपन्या खोट्या जाहिराती काढून बेरोजगारांची फसवणूक करीत आहेत. भरतीच्या मॅसेजची पोलिसांना माहिती दिल्यामुळे कंपनीचे संचालक फरार झाले आणि त्यांनी मोबाईल बंद केला. तरुणांनी खोट्या जाहिरातींना बळी पडू नये.अखिलेश हळवे, उपमहाव्यवस्थापक,महामेट्रो, नागपूर.

टॅग्स :Metroमेट्रोfraudधोकेबाजी