शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

फोनवर म्हणाला अपहरण झालं, रात्रभर शोधत होते पोलीस; मग झाले असे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2021 10:10 IST

दारू पिऊन घरी गेल्यास बायको रागावेल या भीतीने एका व्यक्तीने बायकोला फोन करून अपहरण झाल्याचे सांगितले आणि अचानक फोन बंद झाला. भांबावलेल्या बायकोने पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.

ठळक मुद्देन झालेल्या अपहरणासाठी पोलिसांनी पिंजून काढली रात्रदारूच्या नशेत तर्र नवऱ्याने बायकोच्या धाकाने रचले अपहरणाचे नाट्य

नागपूर : अपघातानंतरअपहरण झाल्याचा फोन करून एका व्यक्तीने चांगलीच खळबळ उडवून दिली. भांबावलेल्या स्थितीत एक महिला पोलीस ठाण्यात पोहोचली. तिने पतीचे अपहरण झाल्याचे पोलिसांना सांगितले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदविला. पोलिसांनी रात्रभर संपूर्ण शहर पिंजून काढले व हा पठ्ठ्या दुसऱ्या दिवशी सुखरुप स्थितीत एका पुलाखाली मद्यधुंद अवस्थेत आढळून आला.

गजेंद्र कोहरे (२६) असे अपहृताचे नाव आहे. तो मुळचा मध्य प्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो पत्नी सुरेखासह नागपुरात कामाच्या शोधात आला होता. सध्या तो गुमगावर मार्गावर असलेल्या महालक्ष्मी लॉनमध्ये मजुरीचे काम करतो व तेथेच राहतो. नेहमीप्रमाणे गजेंद्र मंगळवारी सकाळी काही कामानिमित्त दुचाकी घेऊन घराबाहेर पडला. त्याने पत्नीला लवकर येतो असे सांगितले मात्र, बराच वेळ होऊनही तो घरी परतला नाही. दरम्यान दुपारच्या वेळी त्याने पत्नी सुरेखाला फोन करून त्याच्या दुचाकीला अपघात झाला. व काही लोकांनी त्याला वाहनात बसवून अज्ञात स्थळी नेले. तेथे नेऊन मारहाण केली व बांधून ठेवले असल्याचे सांगितले आणि त्याचा फोन कट झाला.

हा प्रकार ऐकताच सुरेखाच्या पायाखालची जमीन सरकली. तिने गजेंद्रला फोन लावायचा प्रयत्न केला. परंतु, फोन वारंवार बंद येत होता. त्यामुळे ती आणखीनच घाबरली अन् पोलीस ठाणे गाठून पतीचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदविली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. 

दरम्यान, या घटनेची वरिष्ठांना माहिती दिली गेली. वरिष्ठांच्या निर्देशावरून अपहृत आणि अपहरणकर्त्यांचा शोध सुरू झाला. अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी नाकाबंदी करीत संपूर्ण हिंगणा परिसरात शोध घेतला. मात्र, त्याचा कुठेच शोध लागला नाही. पोलिसांनी संपूर्ण रात्र पिंजून काढली. अखेर बुधवारी सकाळी तो एका पुलाजवळ सुरक्षित मिळाला. ही माहिती त्याच्या पत्नीला देण्यात आली. पती सुखरूप असल्याची माहिती मिळताच सुरेखाचा जीव भांड्यात पडला व पोलिसांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला

दारूची नशा अन् बायकोचा धाक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तो सकाळपासूनच दारूच्या नशेत होता. अशा स्थितीत घरी घरी गेल्यास बायको चांगलीच खरडपट्टी काढेल, या भीतीने त्याने पत्नीला फोन करून खोटनाटं सांगितलं. बोलता-बोलता त्याचा फोनही बंद झाला. पुढचे त्याला काहीही आठवत नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. तो सुखरुप घरी आल्याने बायकोला आनंद झाला असला तरी, पोलिसांची मात्र, रात्रभर चांगलीच तारांबळ उडाली. 

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिसKidnappingअपहरणhusband and wifeपती- जोडीदारliquor banदारूबंदी