पत्नीचा मानसिक आजार सिद्ध करण्यात अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:13 IST2021-03-04T04:13:13+5:302021-03-04T04:13:13+5:30

नागपूर : पत्नी मानसिक आजारी असल्याचा आरोप पतीला सिद्ध करता आला नाही. त्यामुळे पतीची या आधारावर घटस्फोट मिळण्याची विनंती ...

Failure to prove wife's mental illness | पत्नीचा मानसिक आजार सिद्ध करण्यात अपयश

पत्नीचा मानसिक आजार सिद्ध करण्यात अपयश

नागपूर : पत्नी मानसिक आजारी असल्याचा आरोप पतीला सिद्ध करता आला नाही. त्यामुळे पतीची या आधारावर घटस्फोट मिळण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नामंजूर केली. न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व नितीन सूर्यवंशी यांनी हा निर्णय दिला.

पत्नी मानसिक आजारी असल्याची माहिती लग्नापूर्वी लपवून ठेवण्यात आली होती. पत्नी सासरी आल्यानंतर विचित्र पद्धतीने वागायला लागली. ती सतत भांडण करते. वाईट शिव्या देते. घरातील कामे करीत नाहीत. कुटुंबीयांना वाईट वागणूक देते. बाहेरचा कचरा घरात आणते असे आरोप पतीने केले होते. परंतु, त्याला हे आरोप सिद्ध करता आले नाहीत. उच्च न्यायालयाने हे आरोप सिद्ध करण्याचे दायित्व पतीचे असल्याचे सांगून पतीला घटस्फोट देण्यास नकार दिला. सुरुवातीला कुटुंब न्यायालयाने घटस्फोट नाकारल्यामुळे पतीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले हाेते. ते अपील फेटाळण्यात आले. पत्नीने कुटुंब न्यायालयात लेखी उत्तर दाखल करून पतीला दुसरे लग्न करायचे असल्याची माहिती दिली होती. तसेच, याकरिता पती शिवीगाळ व मारहाण करतो. तो दारू पिऊन घरी येतो. त्याने गळा दाबून ठार मारण्याचा दोनदा प्रयत्न केला होता असेही पत्नीने सांगितले होते. पती अमरावती व पत्नी अकोला येथील रहिवासी असून त्यांचे २९ एप्रिल १९९७ रोजी लग्न झाले आहे. त्यांना दोन मुले आहेत.

Web Title: Failure to prove wife's mental illness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.