फडणवीसांचे मताधिक्य ‘टॉप’वर

By Admin | Updated: October 20, 2014 00:40 IST2014-10-20T00:40:32+5:302014-10-20T00:40:32+5:30

शहर व जिल्ह्यात भाजपने १२ पैकी तब्बल ११ जागा जिंकल्या. दक्षिण-पश्चिममध्ये प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस हे सर्वाधिक ५८ हजार ९४३ मतांनी विजयी झाले. तर ऐनवेळी काटोलमध्ये पाठविण्यात आलेले

Fadnavis 'maturity on top' | फडणवीसांचे मताधिक्य ‘टॉप’वर

फडणवीसांचे मताधिक्य ‘टॉप’वर

सर्वाधिक मतांनी विजयी : मोदींच्या सभेने तारले पश्चिम
नागपूर : शहर व जिल्ह्यात भाजपने १२ पैकी तब्बल ११ जागा जिंकल्या. दक्षिण-पश्चिममध्ये प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस हे सर्वाधिक ५८ हजार ९४३ मतांनी विजयी झाले. तर ऐनवेळी काटोलमध्ये पाठविण्यात आलेले भाजपचे आशिष देशमुख यांचे मताधिक्य सर्वात कमी राहिले. त्यांनी माजी मंत्री अनिल देशमुख यांना ५ हजार ५५७ मतांनी मात दिली. पश्चिम नागपूर मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली. या सभेने ‘अ‍ॅन्टी इन्कम्बंसी’असतानाही सुधाकर देशमुख यांना तारले.
फडणवीस यांनी काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे यांना एकतर्फी पराभूत केले. पहिल्या फेरीपासूनच फडणवीस आघाडीवर होते. जसजशा फेऱ्या होत गेल्या तसतशी फडणवीस यांची आघाडी वाढत गेली. काटोलमध्ये काका-पुतण्यात काट्याची टक्कर झाली. आशिष देशमुख सुरुवातीपासूनच आघाडीवर होते. मध्ये लीड समतोल झाली होती. पण शेवटी त्यांनी बाजी मारली. येथे शिवसेना भाजपचे मतविभाजन करण्यात अपयशी ठरली. राजेंद्र हरणे यांना फक्त १३ हजार ६४९ मते मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पश्चिम नागपुरातील कस्तुरचंद पार्कवर झाली होती. या सभेला मोठी गर्दी झाली होती. पश्चिम नागपुरात भाजपचे सुधाकर देशमुख यांच्यासमोर काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांचे आव्हान होते. पण मोदींची सभा झाली आणि पश्चिममध्ये भाजपची लहर चालली. या लहरीने देशमुख यांना मोठ्या विजयापर्यंत नेऊन ठेवले. (प्रतिनिधी)

Web Title: Fadnavis 'maturity on top'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.