महापौर निवडणुकीवरून काँग्रेसमध्ये गटबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:09 IST2020-12-31T04:09:31+5:302020-12-31T04:09:31+5:30

महाविकास आघाडीतील एकजूट असल्याचा संदेश देण्यासाठी उमेदवार दिला आहे. परंतु पक्षश्रेष्ठी आदेश देईल त्यानुसार निर्णय घेतला जाईल. - तानाजी ...

Factionalism in the Congress from the mayoral election | महापौर निवडणुकीवरून काँग्रेसमध्ये गटबाजी

महापौर निवडणुकीवरून काँग्रेसमध्ये गटबाजी

महाविकास आघाडीतील एकजूट असल्याचा संदेश देण्यासाठी उमेदवार दिला आहे. परंतु पक्षश्रेष्ठी आदेश देईल त्यानुसार निर्णय घेतला जाईल.

- तानाजी वनवे, विरोधी पक्षनेते

...

बैठक घेऊन एकमताने निर्णय घेऊ

प्रदेश काँग्रेसच्या निर्देशानुसार शहर अध्यक्ष उमेदवारीचा निर्णय घेतात. ही सामान्य प्रक्रिया आहे. पत्र मिळाल्यानंतर उमेदवार निश्चित केला. यात वादाचा विषय नाही. सर्व नगरसेवकांची बैठक घेऊन एकमताने निवडणूक लढविली जाईल. एकच उमेदवार राहील.

- आ. विकास ठाकरे

शहर अध्यक्ष, काँग्रेस

- भाजपमध्ये पदवीधर निवडणुकीतील पराभवाची छाया

उपमहापौर पदासाठी उमेदवार निश्चित करताना भाजपात रस्सीखेच झाली. वर्षा ठाकरे यांच्या नावावर सहमती झाली झाली होती. परंतु काही नेत्यांनी जातीय समीकरण मांडत पदवीधर निवडणुकीतील पराभवाचा मुद्दा उपस्थित करून दबाव निर्माण करून पूर्व नागपुरातील वर्षा धावडे यांचे नाव निश्चित केले. कामाचा विचार करून संधी दिली जात नसल्याने आगामी निवडणुकीत याचा पक्षाला फटका बसू शकतो, अशी भावना काही नगरसेवकांनी व्यक्त केली.

Web Title: Factionalism in the Congress from the mayoral election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.