शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

विदेशी व्यक्तीसोबत फेसबूकची मैत्री महागात पडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 15:52 IST

विदेशी व्यक्तीसोबत फेसबूकवरून मैत्री करणे एका महिलेला चांगलेच महागात पडले. त्या ठगबाज मित्राने गिफ्ट पाठविण्याच्या नावाखाली आपल्या साथीदाराच्या मदतीने महिलेकडून ८६ हजार रुपये हडपले.

ठळक मुद्देगिफ्टचे आमिष दाखवले : महिलेकडून ८६ हजार हडपले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदेशी व्यक्तीसोबत फेसबूकवरून मैत्री करणे एका महिलेला चांगलेच महागात पडले. त्या ठगबाज मित्राने गिफ्ट पाठविण्याच्या नावाखाली आपल्या साथीदाराच्या मदतीने महिलेकडून ८६ हजार रुपये हडपले.स्मीता प्रवीण तपासे (वय ४१) असे पीडित महिलेचे नाव आहे. त्या चंदननगरात राहतात. तपासे यांना गेल्या वर्षी डिकडोल पॉवेल (रा. स्ट्रीट ग्लास्को, ५८ एनबी) नामक आरोपीने फेसबूकवरून फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठविली. तपासे यांनी ती स्विकारल्यानंतर हे दोघे फेसबूक तसेच व्हॉटस्अ‍ॅपवरून चॅटिंग करू लागले. आॅनलाईन मैत्री घट्ट झाल्यानंतर कथित डिकडोल पॉवेलने तपासे यांना आपल्या श्रीमंतीचा परिचय दिला. मैत्रीखातर तुम्हाला गिफ्ट पाठवायचे आहे, असा आग्रहही धरला. त्यानंतर १७ सप्टेंबर २०१७ ला त्याने तपासे यांना गिफ्ट पाठविल्याचा मेसेज दिला. दोन दिवसानंतर सुम्मी टोप्पो, रिना भाटिया आणि मेरी किपजेल (सर्व रा. न्यू दिल्ली) यांनी वेगवेगळे फोन करून दिल्ली विमानतळावर तुमचे गिफ्ट आल्याचे तसेच ते स्विकारण्यासाठी विशिष्ट शुल्क संबंधित बँक खात्यात जमा करण्यास सांगितले. गिफ्ट सोडविण्यासाठी शुल्क जमा केले नाही तर दंड भरावा लागेल, असा धाकही दाखवला. त्यानुसार, १७ ते २६ सप्टेंबर २०१७ या ९ दिवसात तपासे यांनी आरोपीने सांगितलेल्या खात्यात ८६ हजार रुपये जमा केले. या घडामोडीला आता ९ महिने झाले. मात्र, आरोपींनी त्यांना गिफ्ट पाठविले नाही. प्रत्येक वेळी काही न काही कारण सांगून आरोपी रक्कम जमा करण्यास सांगत होते. त्यामुळे तपासे यांना संशय आला. त्यांनी आपल्याला गिफ्ट नको, आपली रक्कम परत करा,असे म्हटले असता आरोपींनी त्यांच्याशी संपर्क तोडला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यामुळे तपासे यांनी इमामवाडा ठाण्यात तक्रार नोंदवली. पीएसआय नेताम यांनी चौकशी करून रविवारी या प्रकरणी उपरोक्त चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.... तरीही फसतातच!ठिकठिकाणी अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या आहेत. फेसबूकवरून फ्र्रेण्डशिप करून ठगबाजांची टोळी अनेकांना लाखोंचा गंडा घालत आहे. महिलांना पुरूष ठगबाज आणि पुरूषांना महिला ठगबाज फसवतात. नागपुरात एका वकिल आणि डॉक्टर तसेच प्राध्यापिकेचीही अशीच फसवणूक झाली आहे. यासंबंधाने वृत्तपत्रातून वेळोवेळी माहिती प्रकाशित होऊनही अनेक जण फसतातच.

 

टॅग्स :Crimeगुन्हाFacebookफेसबुक