शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

सोळावं वरिस धोक्याच : फेसबूक फ्रेण्डच्या नादी लागली; सुरतहून नागपुरात पोहचली

By नरेश डोंगरे | Updated: January 5, 2025 16:26 IST

ऑटोवाला समझदार, म्हणून मोठा अनर्थ टळला. अन्यथा...

नागपूर: मुलींकरिता सोळावे वरिस धोक्याचे, असे म्हटले जाते. तिचेसुद्धा वय वर्षे १६. मुक्काम पोस्ट सुरत, गुजरात. नववीत शिकणाऱ्या सपनाचे (नाव काल्पनिक) चंद्रपूर जिल्ह्यातील फेसबूक फ्रेण्डवर प्रेम जडले. त्याच्यासाठी मागचा-पुढचा कसलाही विचार न करता हाती लागेल तेवढे दागिने बॅगमध्ये कोंबून ती सूरतहून थेट नागपुरात पोहचली. ठरल्याप्रमाणे तो मात्र येथे दिसलाच नाही. त्यामुळे ती कावरीबावरी झाली. अशात तिला दोन समझदार ऑटोवाले भेटले अन् तिचे काळोखात जाऊ पाहणारे भवितव्य सुरक्षित झाले.

सपना चांगल्या सधन घरातील मुलगी आहे. घरी साऱ्या सुख-सुविधा, अर्थातच महागडा मोबाईलही सोबतीला अन् कोणतीही रोकटोक नसल्याने मुलगी ऑनलाईन जगताची सैराट सफर करू लागली. अशात चंद्रपूर जिल्ह्यातील एका युवकाशी तिची फेसबूकवरून ओळख झाली. ती त्याच्या प्रेमात गुरफटली. वयाच्या पुढे जाऊन स्वप्न बघू लागली अन् संधी मिळताच शुक्रवारी तिने बॅग भरली. हाती लागले तेवढे सोन्याचे दागिने त्यात टाकले अन् थेट अहमदाबाद एक्सप्रेसमध्ये बसली. शनिवारी सायंकाळी नागपूर स्थानकावर उतरल्यानंतर तिची नजर भिरभिरू लागली. फलाटावरील हजारोंच्या गर्दीॅत तिला तिचा 'तो' मित्र शोधायचा होता. कारण आधी बोलणी झाल्याप्रमाणे तो तिला रेल्वे स्थानकावर भेटणार होता. गर्दी ओसरली. गाडीही निघून गेली. तो मात्र कुठेच दिसत नव्हता. शेवटी ती फलाट क्रमांक ६ जवळच्या एफओबी जवळ येऊन उभी राहिली. कदाचित तिच्या जवळचे पैसे संपले असावे. ती ऑटोजवळ आली. मोहम्मद शहजाद अब्दुल कलाम (वय २०) आणि बादल सूर्यभान बावणे (वय ३२) यांच्यासोबत तिची बातचित सुरू झाली.

माझ्याकडे सोन्याचे दागिने आहे, ते विकायचे आहे, असे ती म्हणाली. तिच्यासोबत दुसरे कुणीही नव्हते. त्यामुळे शहजाद आणि बादलच्या लक्षात जे यायचे ते आले. त्यांनी प्रसंगावधान राखत थेट रेल्वे पोलिसांना फोन करून या संशयास्पद घटनाक्रमाची आणि मुलीची माहिती दिली. ते कळताच जीआरपीचे ठाणेदार गाैरव गावंडे आपल्या सहकाऱ्यांसह तेथे पोहचले. त्यांनी महिला पोलिसांंच्या मदतीने अल्पवयीन सपनाला ताब्यात घेतले. तिची वास्तपूस्त केली. ती फारशी काही सांगत नसल्याचे पाहून तिच्या बॅगमध्ये असलेल्या डायरीत असलेल्या तिच्या पालकाच्या मोबाईलवर संपर्क केला. ती शुक्रवारपासून गायब असून गुजरात पोलिसांकडे अपहरणाचा गुन्हा दाखल असल्याचेही त्यातून स्पष्ट झाले. दर प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेऊन गावंडे यांनी वरिष्ठांना ही माहिती दिली. त्यानुसार, पोलीस अधीक्षक डॉ. प्रियंका नारनवरे यांनी लगेच रेल्वे पोलीस स्टेशन गाठून मुलीला विचारपूस केली. चाैकशीची औपचारिकता पार पडल्यानंतर सपनाला मुलींच्या शासकीय वस्तीगृहात दाखल करण्यात आले. तिचे पालक नागपुरात आल्यानंतर तिला त्यांच्या स्वाधिन केले जाणार आहे.

... तर काय झाले असते ?शहजाद आणि बादलने समजदारपणा दाखवला म्हणून सपना बचावली. अन्यथा परप्रांतातील एकटी मुलगी सोन्याचे दागिने घेऊन आहे, असे कळताच कुण्याही समाजकंटकाची मती फिरली असती. असे झाले असते तर मोठा अनर्थ घडला असता. मात्र, शहजाद आणि बादलच्या सदसदविवेकबुद्धीमुळे सपनाचे भवितव्य सुरक्षित झाले.

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी