शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
3
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
4
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
5
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
6
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
7
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
8
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
9
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
10
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
11
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
12
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
13
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
14
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
15
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
16
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
17
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
18
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

नागपूर विमानतळावर आता चेहरा ओळख यंत्रणा; प्रवेश होणार सुलभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 10:54 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आता यंत्रणेद्वारे प्रवाशांचा चेहरा ओळखून प्रवेश मिळणार आहे.

ठळक मुद्देतपासणीचा वेळ कमी होणार विमानतळावर यंत्रणेची उभारणी सुरू

वसीम कुरैशी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आता यंत्रणेद्वारे प्रवाशांचा चेहरा ओळखून प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे विविध ठिकाणी होणाऱ्या तपासणीच्या कटकटीपासून प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. याकरिता विमानतळावर बायोमेट्रिक आयडी मॅनेजमेंट यंत्रणा लावण्यात येणार आहे.

घरगुती उड्डाणांसाठी सुविधाया सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना आधार वा पासपोर्टच्या माध्यमातून आॅनलाईन नोंदणी करावी लागेल. त्यानंतर विमानतळावरील यंत्रणेद्वारे चेहऱ्याचे स्कॅनिंग करून त्यांना दिलेल्या रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून चेहरा आणि विवरणाची तपासणी होणार आहे. प्रवाशांची ओळख झाल्यानंतर ई-गेट अथवा सेल्फ बोर्डिंग गेट उघडणार आहे. तिकिटाचा पीएनआर व चेहºयाची ओळख झाल्यानंतर प्रवाशाला एक टोकन देण्यात येईल. पुढील तपासणीत वैयक्तिक ओळखीसाठी कागदपत्रे दाखविण्याची गरज भासणार नाही. नवीन प्रणालीमुळे प्रवाशांना मॅन्युअल तपासणीपासून सुटका मिळेल. सध्या ही सुविधा घरगुती उड्डाणांसाठी राहील. प्रवाशांना उड्डाणाच्या एक तासापूर्वी विमानतळावर जावे लागते. प्रारंभी आयडीसह तिकिटाची तपासणी करण्यात येते. त्यानंतर बॅगचे स्कॅनिंग, चेकइन आणि बोर्डिंग पास व टॅग मिळवावे लागते. पुढील टप्प्यात सुरक्षा यंत्रणेद्वारे तपासणी केल्यानंतर प्रवाशाला विमानात जाता येते. नवीन यंत्रणा बेंगळुरू आणि हैदराबाद विमानतळावर प्रायोगिक तत्त्वावर उभारण्यात आली असून हा प्रयोग यशस्वी ठरला आहे.

प्रवाशांना होणार फायदानवीन यंत्रणेमुळे प्रवाशांना बोर्डिंग पास व सिक्युरिटी तपासणीसाठी रांगेत राहावे लागणार नाही. नवीन व्यवस्थेमुळे विमानतळावरील गर्दी कमी होईल. आधुनिक पद्धतीने पेपरलेस काम होईल. एकदा नोंदणीनंतर प्रवाशाला नंतरच्या प्रवासावेळी ओळखपत्राची गरज भासणार नाही, शिवाय प्रवाशांची ओळख वेगाने होईल. या यंत्रणेमुळे विमान कंपन्या, विमानतळ आणि सुरक्षेत कार्यरत जवांनावरील बोझा कमी होईल.

कंत्राटदाराने अर्धवट कार्य सोडलेविमानतळावर बायोमेट्रिक आयडी मॅनेजमेंट सिस्टीम उभारणीचे काम कंत्राटदाराने तीन महिन्यांपूर्वी अर्धवट सोडले आहे. या संदर्भात विमानतळाचे संचालन करणाऱ्या मिहान इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ विमानतळ संचालक विजय मुळेकर यांनी सांगितले की, हे काम पूर्ण केल्यानंतरच कंत्राटदारांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यंत्रणा यशस्वीरीत्या सुरू झाल्यानंतर कामाचे पैसे देण्यात येईल. तीन महिन्यांपासून पुणे येथील कंपनीचे संचालक आलेले नाहीत.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर