‘महिला क्रिकेटची सचिन तेंडुलकर’ अशी ओळख असलेल्या मिताली राज हिचा जन्म ३ डिसेंबर १९८२ रोजी जोधपूर येथे झाला.
- एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ६,८८८ धावांचा विश्वविक्रम.
- विश्वचषक स्पर्धेत एक हजार धावा पूर्ण करणारी पहिली, तर एकूण पाचवी फलंदाज.
- सलग १०९ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्याचा विक्रम.
- २००३ साली अर्जुन पुरस्काराने, तर २०१५ साली पद्मश्रीने झाला सन्मान.
- २०१५ साली विस्डेन वर्षातील सर्वोत्तम भारतीय क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळवणारी पहिली महिला.
- आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणारी खेळाडू.
- महिला कसोटी क्रिकेटमध्ये २१४ धावांची दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी.
- २०१९ साली २०० एकदिवसीय सामने खेळणारी पहिली महिला खेळाडू ठरली.
लक्षवेधी कामगिरी :
एकाहून अधिक एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक अंतिम सामन्यात (२००५ व २०१७) भारताचे नेतृत्त्व करणारी एकमेव खेळाडू.
कारकीर्द :
कसोटी :
सामने : १०, धावा : ६६३.
एकदिवसीय :
सामने : २०९, धावा : ६,८८८.
टी-२० :
सामने : ८९, धावा : २,३६४.