महाराष्ट्र आॅफिसर्स फोरमच्या अध्यक्षपदी ई.झेड.खोब्रागडे
By Admin | Updated: February 14, 2016 03:06 IST2016-02-14T03:06:08+5:302016-02-14T03:06:08+5:30
महाराष्ट्र आॅफिसर्स फोरमच्या राज्य अध्यक्षपदी माजी सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली.
महाराष्ट्र आॅफिसर्स फोरमच्या अध्यक्षपदी ई.झेड.खोब्रागडे
बैठकीत एकमताने निर्णय
नागपूर : महाराष्ट्र आॅफिसर्स फोरमच्या राज्य अध्यक्षपदी माजी सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली.
महाराष्ट्र आॅफिसर्स फोरमची शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन (बानाई) सभागृह उर्वेला कॉलनी येथे राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज्यस्तरीय कार्यकारी समितीची निवड करण्यात आली. त्यात ई. झेड. खोब्रागडे यांची एकमताने राज्य अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
यासोबतच टी.बी. देवतळे व डॉ. विजय माहुरे (नांदेड) यांची उपाध्यक्षपदी, तर शिवदास वासे (सचिव), डॉ. बबन जोगदंड (सहसचिव), विलास सुटे (कोषाध्यक्ष) आणि भारत कदम (औरंगाबाद), रमेश जंजाळ (मुंबई), कैलास पगारे (मुंबई), आमिता पिल्लेवार (नाशिक) आणि सुधाकर तलवारे (अमरावती) यांची फोरमच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. यानंतर विभागनिहाय आणि जिल्हास्तरीय समितीची निवड करण्यात येईल आणि त्यानंतर फोरमच्या कामाला गती प्रदान केली जाईल, असेही निश्चित करण्यात आले. (प्रतिनिधी)